उल्हासनगर शिवसेना शिंदे गटातून गणेश साळुंकेची हकालपट्टी, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: April 16, 2023 05:44 PM2023-04-16T17:44:55+5:302023-04-16T17:45:53+5:30
चायनीजवाल्याने फुकट चायनीज दिली नसल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने चायनीज दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार उघड आला.
उल्हासनगर: गोलमैदान येथील चायनीजवाल्याने फुकट चायनीज दिली नसल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने चायनीज दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार उघड आला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गणेश साळुंके याच्यावर गुन्हा दाखल झाला असून शिवसेना शिंदे गटाच्या वैधकीय कक्ष विभागाचे गणपती कांबळे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन साळुंके याची पक्षातून हकालपट्टी केली. तसेच चायनीज दुकानदारांची जाहीर माफी मागितली आहे.
ठाणे व कल्याण शहरानंतर शिवसेना शिंदे गटाचा मारहाण प्रकरण गाजत असतांना, फुकट चायनीज दिली नाही म्हणून एका सिंधी व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगरात घडला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून शिवसेना शिंदे गटाच्या वैधकीय कक्षाने मारहाणीची दखल घेऊन, गणेश साळुंके याची पक्षातून हकालपट्टी केली. तसेच मारहाण झालेल्या व्यापाऱ्यांची माफी मागितली. शहरातील गोलमैदान परिसरात मोहित पंजवानी यांची चायनीज दुकान आहे. १५ एप्रिल रोजी रात्री शिवसेना शिंदे गटाचे वैधकीय कक्ष विभागाचे पदाधिकारी गणेश साळुंके चायनीज घेण्यासाठी गेले. मात्र चायनिज घेतल्यानंतर दुकानदाराने पैसे मगितल्याच्या रागातून साळुंके याने दुकानदार पंजवानी यांना मारहाण केली. मारहाणीचा घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गणेश साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
फुकट चायनीज दिली नाही म्हणून चायनीज व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱयां विरोधात शहरातून नाराजीचे व टीकेचे सूर आवळले. या मारहाणीचा दखल शिवसेना शिंदे गटाचे वैधकीय पदाधिकारी गणपती कांबळे यांनी घेतली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन गणेश साळुंके याची पक्षातून हकालपट्टी केली. तसेच चायनीज दुकानदार मोहित पंजवानी यांची झालेल्या घटने बाबत माफी मागितली आहे. याप्रकारने शिवसेना शिंदे गटात कोण कोणाचा प्रवेश घेतला. याबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. श्रीराम चौकातील एका बार चालकाचा पक्ष प्रवेश असाच गाजला असून अनेक घातक गुन्हे दाखल असलेल्याची शिंदे गटात वर्णी लागल्याची चर्चाही शहरात रंगली आहे.