Thane: उल्हासनगर मनपा नगररचनाकार प्रकाश मुळे यांची हकालपट्टी? अनियमित बांधकाम परवाने दिल्याचा ठपका

By सदानंद नाईक | Published: May 11, 2024 03:39 PM2024-05-11T15:39:29+5:302024-05-11T15:39:50+5:30

Ulhasnagar News: उल्हासनगर शहर विकास आराखड्याचे उल्लंघन करून थेट रस्त्यावर व आरक्षित भूखंडावर बांधकाम परवानगी दिल्याचा ठपका ठेवून नगररचनाकार प्रकाश मुळे यांची आयुक्त अजीज शेख यांनी हकालपट्टी केली.

Expulsion of Ulhasnagar municipal planner Prakash Mule? Blamed for issuing irregular construction permits | Thane: उल्हासनगर मनपा नगररचनाकार प्रकाश मुळे यांची हकालपट्टी? अनियमित बांधकाम परवाने दिल्याचा ठपका

Thane: उल्हासनगर मनपा नगररचनाकार प्रकाश मुळे यांची हकालपट्टी? अनियमित बांधकाम परवाने दिल्याचा ठपका

- सदानंद नाईक
उल्हासनगर - शहर विकास आराखड्याचे उल्लंघन करून थेट रस्त्यावर व आरक्षित भूखंडावर बांधकाम परवानगी दिल्याचा ठपका ठेवून नगररचनाकार प्रकाश मुळे यांची आयुक्त अजीज शेख यांनी हकालपट्टी केली. मुळे यांनी दिलेल्या बांधकाम परवान्याची चौकशी करण्याचे संकेत आयुक्त शेख यांनी दिले आहे.

उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभाग पुन्हा वादात सापडले असून अनियमित बांधकाम परवाने, कोरोना काळातील ५० टक्के प्रिमियम शुल्कात अनियमितता आदींचा ठपका आयुक्त अजीज शेख यांनी नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर ठेवला. तसेच तपासा दरम्यान हस्तक्षेप नको म्हणून मुळे यांची नगररचनाकार पदातून आयुक्तांनी कार्यामुक्त केले. संपूर्ण बांधकाम परवान्याची फेरतपासणी करण्याचे आदेश सहायक संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे यांना आयुक्तांनी दिले असून या आदेशाने संबंधित महापालिका अधिकारी, बिल्डर, वास्तुविशारद, राजकीय नेते आदी मध्ये खळबळ उडाली आहे. मुळे यांनी शहर विकास आराखड्या नुसार बांधकाम परवानगी दिली नसून काही बांधकाम परवाने चक्क रस्त्यावर दिल्याचे उघड झाले आहे. 

महापालिकेची कोणत्याही परवानगी विना खाजगी कर्मचाऱ्यांना नगररचनाकार विभागात कामाला ठेवल्या प्रकरणी प्रकाश मुळे यांच्यासह ४ जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच मुळे यांच्या विरोधात शासनाकडे नागरिकांना तक्रारी केल्याने, त्या तक्रारीचा निपटारा महापालिकेला करावा लागत आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्या नगररचनाकार विभागाकडून सलग दोन वर्षे सर्वाधिक ५५ कोटीचे उत्पन्न मुळे यांनी मिळून दिले होते. बांधकाम परवाना देण्याच्या प्रक्रियेत मुळेसह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्याचा समावेश असतो. त्या संबंधितांवर महापालिका आयुक्त अजीज शेख काय कारवाई करतात. याकडे सर्वांचें लक्ष लागले आहे.

संपूर्ण बांधकाम परवान्याची चौकशी - आयुक्त अजीज शेख 
महापालिका नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी शहर विकास आराखड्यानुसार इमारतीला बांधकाम परवानगी मध्ये अनियमितता आढळली असून नागरिकांच्या मोठया प्रमाणात तक्रारी आहेत. तसेच कोरोना काळातील ५० टक्के प्रिमियम शुल्कातही अनियमितता आहे, बांधकाम परवान्याची चौकशी आदेश दिले.

माजी नगररचनाकार करपे यांचा शोध लागेना?
  महापालिका नगररचनाकार विभाग नेहमी वादात राहिला असून बहुसंख्य नगररचनाकारांनी जेलची हवा खाल्ली आहे. तर बांधकाम परवण्यावर सही न करणारे तत्कालीन नगररचनाकार संजीव करपे सन-२०१६ पासून खालापूर घाटातून बेपत्ता झाले. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गेल्या ९ वर्षात त्याचा शोध लागला नाही.

Web Title: Expulsion of Ulhasnagar municipal planner Prakash Mule? Blamed for issuing irregular construction permits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.