ठाण्यातील पुस्तकांच्या दुकानांची वेळ वाढवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जिल्हाधिकारी, आयुक्तांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 10:51 AM2021-06-14T10:51:41+5:302021-06-14T10:52:11+5:30
Neelam Gorhe : सध्या शाळा व महाविद्यालये सुरू होण्याचा कालावधी आहे. त्यामुळे शालेय पुस्तके व साहित्याची खरेदीची ही वेळ आहे. अशा वेळेस मुलांना नवीन शैक्षणिक साहित्य व पुस्तके मिळणे आवश्यक आहे.
ठाणे : शहरातील पुस्तकांची दुकाने सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाणे जिल्हाधिकारी व ठाणे मनपा आयुक्त यांना केली आहे. तसे पत्र त्यांनी दिले आहे.
कोविड १९ चे लॉकडाऊननंतर मिशन बिगीन अगेन सुरू झाले आहे. त्यानुसार अनेक व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ६ जून २०२१ च्या शासन आदेशानुसार मुंबई व ठाणे हे दोन्ही जिल्हे टप्पा तीनमध्ये असून याठिकाणी सर्व दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सध्या शाळा व महाविद्यालये सुरू होण्याचा कालावधी आहे. त्यामुळे शालेय पुस्तके व साहित्याची खरेदीची ही वेळ आहे. अशा वेळेस मुलांना नवीन शैक्षणिक साहित्य व पुस्तके मिळणे आवश्यक आहे.
शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी पुस्तके विक्रीची व शालेय साहित्य विक्रीची दुकानाची वेळ वाढवून सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देणे गरजेचे आहे, अशी मागणी करणारे निवेदन पुस्तक दुकाने संघटनांनी डॉ. गोऱ्हे यांना दिले हाेते.