उमरोठे गावात भीषण पाणीटंचाई; १५ पाडे तहानले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:52 PM2019-04-24T22:52:34+5:302019-04-24T22:52:43+5:30
टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी
वाडा : तालुक्यातील उमरोठे गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत असून महिलांना घरातील इतर कामे बाजुला ठेऊन पूर्ण दिवस पाण्यासाठीच खर्च करावा लागत आहे.
या वर्षी पाऊस एक ते दोन महीने आधीच गेल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीसंकट ओढविले आहे. त्यातच पाण्याची पातळी खुपच खाली गेल्याने बोरवेल आणि विहिरीत सुद्धा पाणी राहिले नसल्याने मोठे जलसंकट ओढविले आहे. त्यातच शासकीय नळ योजनांचा उडालेला बोजवारा पाणीसंकटात आणखीच भर घालत आहे. पाणीटंचाईवर उपाय न केल्यास उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तालुक्यात अतिदुर्गम व आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उज्जैनी, ओगदा, वरसाळा या ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया वहिरा, भोकरपाडा, वडवली, उजैनी गावठाण, तिळमाळ, पाचघर, खडकपाडा, चारणवाडी, कडूपाडा, येथे पाणीबाणीचे वातावरण आहे.
टॅँॅँकरची मागणी
उमरोठे गावात जुनी नळयोजना असून ती नादुरु स्त अवस्थेत आहे. तर विहीरींमध्ये पाणी राहिलेले नाही. त्यातच भूजल पातळी खालावल्याने बोरवेलसुद्धा आटल्या आहेत. यामुळे गावाला तत्काळ टॅँंकरने पाणीपुरवठा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.