मुंब्य्रात नेत्रहीन तरुणाने दिला डोळसांना संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:45 PM2020-02-10T23:45:53+5:302020-02-10T23:46:00+5:30
स्ट्रीट कार्निव्हल : अमली पदार्थाविरोधात केली जनजागृती, दिव्यांग मित्रांनीही घेतला सहभाग
कुमार बडदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाºया डोळसांनी त्यापासून परावृत्त व्हावे, यासाठी दहावीच्या एका नेत्रहीन तरुणाने स्ट्रीट कार्निव्हलमध्ये जनजागृती केली.
रविवारी मुंब्रा पोलीस ठाणे ते शंकर मंदिरादरम्यान स्ट्रीट कार्निव्हल आयोजित करण्यात आला होता. संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋता आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्निव्हलमध्ये अमली पदार्थांच्या सेवनापासून होणाºया दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. कार्निव्हलमध्ये सहभागी झालेल्या क्वीन मेरी हायस्कूल, रफिका हायस्कूल, भारत स्कूल आदी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच उम्मीद फाउंडेशनच्या माध्यमातून चालविण्यात येणाºया दिव्यांगांच्या शाळेत दहावीत शिकणाºया शोएब सारंगा या जन्मापासून नेत्रहीन असणाºया तसेच अनेक शस्त्रक्रि यांनंतरही दृष्टी परत न मिळालेल्या विद्यार्थ्यानेदेखील त्याच्या मालदार माहिर, फझल खान, मोहम्मद साद या दिव्यांग मित्रांच्या मदतीने पथनाट्याच्या माध्यमातून दारू तसेच सिगारेटप्रमाणेच गांजा, चरस, एमडी पावडर, गुंगी आणणाºया औषधांच्या सेवनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम तसेच त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना सोसाव्या लागणाºया यातनांबाबत जनजागृती केली. कार्निव्हलमध्ये एकूण ६४ शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अमली पदार्र्थांविरोधातील मोहीम सुरूच राहणार असल्याचे ऋता आव्हाड यांनी यावेळी ‘लोकमत’ला सांगितले.
विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे
कार्निव्हलमध्ये सहभागी झालेल्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा, निसर्ग वाचवा असा संदेशही दिला. कराटे प्रशिक्षक याकूब खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी स्वरक्षणाचे धडे प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिले. कार्निव्हलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते, त्यांनी स्टॉलमुळे स्वावलंबनाचे धडे मिळाल्याचे सांगितले.