बारमालक-पालिका आमनेसामने, एनओसीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:04 AM2017-09-25T00:04:56+5:302017-09-25T00:05:05+5:30

कोठारी कम्पाऊंडच्या अनियमिततेचे मुद्दे उपस्थित करून लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला अडचणीत आणल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी ठाण्यातील बार-हॉटेलवर कारवाई केली जाईल

In the face of the Barrakal Municipality, the NOC's notices started playing | बारमालक-पालिका आमनेसामने, एनओसीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात

बारमालक-पालिका आमनेसामने, एनओसीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात

Next

ठाणे : कोठारी कम्पाऊंडच्या अनियमिततेचे मुद्दे उपस्थित करून लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला अडचणीत आणल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी ठाण्यातील बार-हॉटेलवर कारवाई केली जाईल, हा अंदाज खरा ठरला असून अग्नीशमन दलाची एनओसी सादर करण्यासाठी पालिकेने नोटिसा बजावण्यास सुरूवात केली असून आठवडाभरात कागदपत्रे सादर करावी लागतील. ती न केल्यास दसºयानंतर पालिका सील ठोकण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या या नोटिसांमुळे हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. आधीच नोटाबंदी, जीएसटी आणि मध्यंतरीच्या काळात ५०० मीटरच्या हद्दीच्या निकालामुळे अडचणीत आलेले बार-हॉटेल आता कुठे गजबजू लागले असताना पुढील आठवड्यात सील ठोकले गेले तर या व्यवसायाचे कंबरडे मोडेल, अशी त्यांची भावना आहे. राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी काढलेल्या परित्रकानुसार एकदा अग्नीशमन विभागाची एनओसी घेतली तर तिचे पुन्हा नूतनीकरण करण्याची गरज नाही. त्यामुळे पालिकेची ही कारवाई बेकायदा आहे. त्याविरोधात आम्ही दाद मागू असा पवित्रा हॉटेल मालकांच्या संघटनेने घेतल्याने दोन्ही व्यवस्था आमनेसामने उभ्या आहेत.
पालिकेने २००६ मधील महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक कायद्याचा हवाला देत अग्नीशमन विभागाची एनओसी बंधनकारक आहे, ती नसेल तर हॉटेलांना परवाने देऊ नयेत, या नियमावर बोट ठेवले आहे. ठाण्यातील ९० टक्के बार-हॉटेलांकडे अशी एनओसी नाही. त्यांनी बेकायदा बांधकाम केले आहे. त्याबद्दल त्यांना पूर्वीच नोटिसा दिल्या होत्या, पण नंतर राजकीय दबावापोटी कारवाई थांबवली. आता रितसर नोटिसा पाठवल्याने साºया गोष्टी कायद्याच्या कक्षेत येतील आणि उद्या बारमालक कोर्टात गेले तरी कारवाईचा पालिकेचा निर्णय उचलून धरला जाईल, अशी माहिती पालिका अधिकाºयांनी दिली.
सरकाने नेमलेल्या यंत्रणेमार्फत बारमालकांनी फायर आॅडिट करून घ्यावे, असे पत्रक दोन वर्षांपूर्वी अग्नीशमनच्या संचालकांनी काढल्याने पालिकेची आताची कारवाई बेकायदा आहे, असा दावा करून हे परिपत्रक पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना देण्यात आले आहे.

Web Title: In the face of the Barrakal Municipality, the NOC's notices started playing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.