नकारातूनच माणूस पुढची पायरी चढतो आणि उत्कर्ष होतो

By admin | Published: July 4, 2017 06:35 AM2017-07-04T06:35:22+5:302017-07-04T06:35:22+5:30

अभिनयात करिअर करण्यासाठी चांगले दिसणे, विचारात सुसूत्रता पाहिजे, हे सर्व उपयुक्त साधने आहेत. मात्र, आपल्या आयुष्यात

In the face of rejection, the next step increases and flourishes | नकारातूनच माणूस पुढची पायरी चढतो आणि उत्कर्ष होतो

नकारातूनच माणूस पुढची पायरी चढतो आणि उत्कर्ष होतो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : अभिनयात करिअर करण्यासाठी चांगले दिसणे, विचारात सुसूत्रता पाहिजे, हे सर्व उपयुक्त साधने आहेत. मात्र, आपल्या आयुष्यात कुणीतरी आपल्याला नाकरणारे पाहिजेत. हे आयुष्यात घडलेच पाहिजे. नकारातूनच माणूस पुढची पायरी चढायला शिकतो, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका आणि निवेदिका संपदा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
‘वेध’ या संस्थेतर्फे कलाकरांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘वेध-भेट’ या कार्यक्रमात कुलकर्णी यांनी मुलांशी संवाद साधला. रामनगरमधील आनंद बालभवनमध्ये रविवारी झालेल्या हा कार्यक्रम झाला. त्यात सौरभ सोहोनी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी संस्थेचे संकेत ओक, मधुरा ओक, दीपाली काळे, भाग्यलक्ष्मी पडसलगीकर, पै लायब्ररीचे पुडंलिक पै आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘नागमंडल’ या नाटकासाठी जर्मनीला जाण्याची संधी मला महाविद्यालयीन जीवनात चालून आली होती. निवड झाल्यावर लोकांनी डोक्यावर घेतले. विजया मेहता यांनी निवडले त्यामुळे माझे करिअर चांगले झाले, अशी चर्चा सुरू होती. ऐनवेळी त्यांनी तू या नाटकात नाही, असे त्यांनी सांगितले. विजयातार्इंनी दिलेल्या नकारानंतर त्यांच्या हस्तेच पुरस्कार घेणार, एवढे मनाशी पक्का ठरवले. त्यांचा नकार माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला. प्रत्येक व्यक्तीचे पाय मातीचे असतात, हे दाखणारा तो क्षण होता. त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही द्वेषाची भावना नव्हती. मी पुढे त्यांच्याकडून ११ पुरस्कार घेतले. पुढचे हजारो होकारांसाठी तो पहिला नकार महत्त्वाचा होता. नाट्यसृष्टीत मोजक्याच महिलांनी जग पाहिले आहे. त्यामुळे विस्तृत दृष्टीकोन विजयातार्इंकडे आहे. त्यामुळे पुढे मी त्यांच्याकडे नाट्य प्रशिक्षणासाठीही गेली, असे त्यांनी सांगितले.
रिमा लागू यांच्यासोबत ‘घर तिघां’चे हे नाटक केले. त्यावेळी दौऱ्याला बस निघणार म्हणजे काय हे माहीत नव्हते. मी पहिल्या सीटवर बसली होती. ती सीट मुख्य अभिनेत्रीची होती. हे समजल्यावर चौथ्या सीटवर बसली. त्या पहिल्या सीटवर जाण्यासाठी अनेक कलाकृती द्याव्या लागणार आहेत, हा अंकुर माझ्यात रीमातार्इंमुळे फुटला, असे त्या म्हणाल्या.
मी निवेदन करताना कंटाळा येणार नाही, याची काळजी घेते. निवेदन हे खूप आव्हानात्मक क्षेत्र आहे. चांगल्या व मेहनती लोकांसाठी हे खूप चांगला क्षेत्र आहे. या क्षेत्रात संयम असावा लागतो. अनेक गोष्टी आवडत नसताना कराव्या लागतात. कारण आपल्याकडे दिग्दर्शकाचा दृष्टीकोन नसतो. हे प्रशिक्षण आपल्याला कोणतीही संस्था देऊ शकत नाही. माझा आवाज समजंस असावा, असे नेहमी वाटते. कारण मी शिक्षिकेची मुलगी आहे. माझी आई मला समजून सांगत असे. चांगल्या आवाजासाठी व्यायाम केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

बालनाट्य प्रशिक्षकांनी मक्तेदारी घेऊ नये
बालनाट्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये स्वामीत्व भावना तयार होते. जो तो आपली पुंजी घेऊन आला आहे. तो त्या मार्गानेच जाणार आहे. संस्थांनी कुणीची ही मक्तेदारी घेऊ नये. संस्थेत शिक्षण देणाऱ्या पाच व्यक्तींच्या अभिनयाच्या स्टाइलशिवाय खूप मोठे जग आहे. संस्था प्रशिक्षकांनी गुरू बनल्यावर थांबू नका. आयुष्यभर शिष्य बनून राहा, असा सल्ला संस्थांनाही कुलकर्णी त्यांनी या वेळी दिला.

समाधान महत्त्वाचे : एखाद्या गोष्टींचे मॅनेजमेंट तेव्हाच होते. जेव्हा ती गोष्ट आपल्याला आवडते. त्यामुळे ज्या गोष्टीत मनापासून समाधान मिळते तीच गोष्ट करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

Web Title: In the face of rejection, the next step increases and flourishes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.