फेसबूक कमेंटमुळे मनसेच्या उपविभाग अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

By Admin | Published: October 29, 2016 05:12 PM2016-10-29T17:12:31+5:302016-10-29T17:12:31+5:30

च्छतेसंदर्भात पोस्ट टाकल्याचा राग मनात धरुन माजी सरपंच व त्याच्या साथीदाराने मनसेचे उपविभाग अध्यक्ष शशीकांत कोकाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे.

Facing a Facebook account, the MNS sub-divisional president suffered a fatal attack | फेसबूक कमेंटमुळे मनसेच्या उपविभाग अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

फेसबूक कमेंटमुळे मनसेच्या उपविभाग अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
डोंबिवली, दि. २९- -फेसबूकवर स्वच्छतेसंदर्भात पोस्ट टाकल्याचा राग मनात धरुन माजी सरपंच व त्याच्या साथीदाराने मनसेचे उपविभाग अध्यक्ष शशीकांत कोकाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. त्यांना जबर मारहाण केली आहे. त्यांच्या डोक्याला इजा झाली. कोकाटे हे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर हल्ला करणा-या पाच जणांच्या विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
मात्र अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. मनसेच्या पदाधिका-यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिस उपायुक्तांची लवकरच भेट घेऊन कोकाटे यांच्यावर हल्ला करणा-यांना त्वरीत अटक करण्याची मागणी केली आहे.
 
कोकाटे हे स्टार कॉलनीत राहतात. गांधीनगर व पांडुरंगवाडी या परिसराचे कोकाटे मनसेचे उपविभागाध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांनी त्यांच्या फेसबूकवर एक पोस्ट टाकली. बिर्याणी खाऊन बिअरचा घोट घेत जल्लोषात नगारा वाजविला. त्याचा त्रस विकले न गेलेल्या मतदारांना सोसावा लागत आहे. सणासूदीला या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
 
त्याठिकाणी अजिबात स्वच्छता केली जात नाही. धूरीकरण केले जात नाही. लाखो रुपये खर्च करुन निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींना ही दिवाळी सूख समृद्धीची जावो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. कोकाटे यांनी ही पोस्ट टाकल्यावर त्या परिसरातील माजी सरपंच रविंद्र आंबो म्हात्रे यांच्या पुतण्या सुरेश पाटील याचा त्यांना फोन आला. त्याने धमकी दिली. अशी पोस्ट का टाकली. त्यानंतर रविंद्र म्हात्रे यांनी धमकीचा फोन केला. मानपाडा रोडवर कोकाटे यांना गाठून रविंद्र म्हात्रे, सचिन पाटील, सुनिल लॉन्ड्रीवाला व अन्य पाच जणांनी मिळून कोकाटे यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यात कशाल्या तरी हत्यारे प्रहार केला. त्यांच्या डोक्याला जखमी झाली आहे. तसेच बराच मुक्का मार लागला आहे. कोकाटे यांना उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. कोकाटे यांनी मर्मभेदी फेसबूक पोस्ट ही लोकप्रतिनिधींना रुचलेली नाही. मे महिन्या प्रोबेस कंपनीत स्फोट झाला तेव्हा अनेकांना वाचविण्याचे काम कोकाटे यांनी केले होते. 
 
त्या बदल्यात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. कोकाटे यांचे चांगले काम त्याठिकाणच्या लोकप्रतिनिधीना चांगले वाटलेले नसून कोकाटे हे तेव्हा पासून त्यांच्या डोळ्य़ावर आले आहेत. कोकाटे यांच्यावर हल्ला करणा-या आरोपीना तातडीने अटक केली नाही. तर मनसे पोलिस उपायुक्तांची भेट घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिला आहे.
 
 
 

Web Title: Facing a Facebook account, the MNS sub-divisional president suffered a fatal attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.