पाणीबिले न भरल्यास नळजोडण्या खंडित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:23 AM2021-03-30T04:23:41+5:302021-03-30T04:23:41+5:30
ठाणे : ठाणे महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत पाणीबिलाच्या देयकांची रक्कम भरणा न केल्यास १ एप्रिलपासून मोठ्या ...
ठाणे : ठाणे महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत पाणीबिलाच्या देयकांची रक्कम भरणा न केल्यास १ एप्रिलपासून मोठ्या प्रमाणावर नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिला. तर कोरोनामुळे अशा प्रकारची कारवाई करू नये, किमान तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ताकर आणि पाणीदेयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू आहे. मालमत्ता आणि पाणीकर वसुलीसाठी प्रभाग समितीनिहाय दैनंदिन उद्दिष्टे देण्यात आली आहेत. या आर्थिक वर्षातील पाणीदेयकांची तसेच मागील थकबाकी ३१ मार्च २०२१ अखेर न भरल्यास १ एप्रिलपासून नळजोडण्या खंडित करण्यात येणार असून, नागरिकांनी वेळेत पाणी देयके भरून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
..........