उल्हासनगरातील दुकानात पुमा कंपनीचे बनावट चप्पल-बूट, गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Published: January 29, 2023 07:31 PM2023-01-29T19:31:43+5:302023-01-29T19:32:17+5:30

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात रोशन तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल केला.

fake slippers boots of puma company in shop in ulhasnagar case registered | उल्हासनगरातील दुकानात पुमा कंपनीचे बनावट चप्पल-बूट, गुन्हा दाखल

उल्हासनगरातील दुकानात पुमा कंपनीचे बनावट चप्पल-बूट, गुन्हा दाखल

Next

सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-३ परिसरातील दुकानात पुमा कंपनीचे बनावट चप्पल, बूट स्लिपर ठेवून ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात रोशन तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल केला.

उल्हासनागरात कॅम्प नं-३, कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावरील एका दुकानात पुमा कंपनीचे बनावट बूट, चप्पल व स्लिपर चप्पलची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या मिळाली. त्यांनी शनिवारी सायंकाळी सव्वा सात वाजता धाड टाकून पुमा कंपनीचे १ लाख ४० हजार ७०० रुपयांचे बनावट बूट, चप्पल, स्लिपर छप्पलचा साठा जप्त केला. यापूर्वी पवई चौक दुकानातून पुमा कंपनीच्या बनावट बॅग जप्ती करून दुकांदारावर गुन्हा दाखल केला होता. 

पुमा कंपनीच्या बनावट बूट, चप्पल विकणारा दुकानदार रोशन किशन तेजवाबी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून बनावट चप्पल व बूट बनविणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: fake slippers boots of puma company in shop in ulhasnagar case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.