जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बनावट ट्विटर खाते, आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 08:33 AM2021-03-20T08:33:49+5:302021-03-20T08:34:13+5:30
ट्विटर अकाउंटवर आव्हाड यांचे छायाचित्र अपलोड करून शिवसेनेला उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आलेली आहे. हा प्रकार आव्हाड यांच्या निकटवर्तीयांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब त्यांच्या निर्दशनास आणून दिली.
ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट सुरू करून आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आव्हाड यांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.
ट्विटर अकाउंटवर आव्हाड यांचे छायाचित्र अपलोड करून शिवसेनेला उद्देशून आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आलेली आहे. हा प्रकार आव्हाड यांच्या निकटवर्तीयांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब त्यांच्या निर्दशनास आणून दिली. आपल्या नावाचा गैरवापर करून शिवसेनेविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकून सरकारमध्ये वाद पेटवून देण्याचा हा प्रकार असल्यामुळे त्यांनी १६ मार्च रोजी वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून ही पोस्ट हटविण्याची विनंती ट्विटरला केली आहे.