ठाण्यात छताचे प्लास्टर पडून मायलेक जखमी; आईला मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवले

By अजित मांडके | Published: July 24, 2024 12:53 PM2024-07-24T12:53:29+5:302024-07-24T12:54:27+5:30

...यामध्ये सुनंदा वारंग (६३) आणि दिनेश (३८) असे मायलेक जखमी झाले आहेत. सुनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

falling plaster of ceiling in Thane two injured The mother was shifted to Sion Hospital in Mumbai | ठाण्यात छताचे प्लास्टर पडून मायलेक जखमी; आईला मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवले

ठाण्यात छताचे प्लास्टर पडून मायलेक जखमी; आईला मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवले

 ठाणे: लोकमान्य नगर पाडा क्रमांक ०३ या ठिकाणी असलेल्या तळ अधिक एक मजली तुळजाभवानी निवास या चाळीच्या घरातील तळ मजल्याच्या रूममधील छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुनंदा वारंग (६३) आणि दिनेश (३८) असे मायलेक जखमी झाले आहेत. सुनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

                लोकमान्य नगर पाडा क्रमांक ०३ येथील मायलेक छताचे प्लास्टर पडून जखमी झाल्याची माहिती कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉ योगेश यांनी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानुसार घटनास्थळी सहाय्यक आयुक्त (लोकमान्य सावरकर प्रभाग समिती), कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग-लोकमान्य सावरकर प्रभाग समिती), अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (लोकमान्य सावरकर विभाग समिती) व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. त्या चाळीत तळ आणि पहिल्या मजल्यावर प्रत्येकी तीन- तीन असे सहा रूम आहेत.

यातील रूम नंबर ०१ मधील प्लास्टर पडले असून ती रूम नम्रता वेंगुर्लेकर यांच्या मालकीची आहे. तेथे जखमी वारंग कुटुंब भाड्याने राहत आहेत. तसेच त्या चाळीचे बांधकाम अंदाजे २० ते २५ वर्षे जुने आहे. या घटनेत सुनंदा वारंग यांच्या छातीला, पोटाला तसेच उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना सुरुवातीला कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ  दाखल करण्यात आले होते, तेथून त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दिनेश यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर घटनास्थळी लोकमान्य-सावरकर प्रभाग समिती यांचे मार्फत पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

 

Web Title: falling plaster of ceiling in Thane two injured The mother was shifted to Sion Hospital in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.