घरकाम करणा-या मुलीला दिले चटके, आरोप खोटे : तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:34 AM2017-10-27T03:34:44+5:302017-10-27T03:35:04+5:30

कल्याण : ‘मोहन प्राइड’ या हायप्रोफाइल सोसायटीत राहण्या-या अनिल व सीमा तलवार दाम्पत्याने त्यांच्याकडे घरकाम करणा-या १५ वर्षांच्या मुलीला अमानुष मारहाण करून चटके देऊन तिचा छळ केल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

False charges: Goldman | घरकाम करणा-या मुलीला दिले चटके, आरोप खोटे : तलवार

घरकाम करणा-या मुलीला दिले चटके, आरोप खोटे : तलवार

Next

कल्याण : ‘मोहन प्राइड’ या हायप्रोफाइल सोसायटीत राहण्या-या अनिल व सीमा तलवार दाम्पत्याने त्यांच्याकडे घरकाम करणा-या १५ वर्षांच्या मुलीला अमानुष मारहाण करून चटके देऊन तिचा छळ केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. मुलीने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून पळ काढल्यानेत्याला वाचा फुटली. खडकपाडा पोलीस ठाण्यात तलवार दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
घरकामासाठी त्यांनी या अल्पवयीन मुलीला दिल्लीहून आणले होते. मारहाणीमुळे तिच्या अंगावर वळ उठले आहेत. तिला चटकेही देण्यात आले. त्याला कंटाळून ती तलवार यांच्या तावडीतून बाहेर पडली. त्यानंतर, तिने सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकूर यांच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्ष गाठला. त्यांनी तिला खडकपाडा पोलीस ठाण्यात पाठवले. तेथे तिने घडला प्रकार सांगितला. सुरुवातीला पोलिसांनी तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली नव्हती. ही मुलगी मूळची झारखंड येथील आहे. प्लेसमेंट चालक अजयकुमार याने तिला दिल्ली येथे कामाला लावण्याचे प्रलोभन दाखवत कल्याणला तलवार यांच्या घरी घरकामासाठी आणले असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. मुलीवर आणखी काही अत्याचार झाले आहेत का, याचाही आता पोलीस तपास करत आहेत.
मुलगी सज्ञान असल्याची कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली असली, तरी मुलीनेच स्वत:चे वय १५ वर्षे असल्याचे सांगितल्याने वयाचा पेच निर्माण झाला आहे. तो वैद्यकीय तपासणीअंती सुटणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अनिल व सीमा तलवार यांनी मुलगी १८ वर्षांची असून ती सज्ञान आहे. मुलीने केलेले आरोप खोटे व निराधार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: False charges: Goldman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.