योजनेसाठी सादर केली खोटी कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:56 PM2018-02-23T23:56:38+5:302018-02-23T23:56:38+5:30

तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत सुपेगावमधील माजी सरपंच रोहिदास मढवी व सदस्य रोहिणी मढवी या दाम्पत्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करून

False documents submitted for the scheme | योजनेसाठी सादर केली खोटी कागदपत्रे

योजनेसाठी सादर केली खोटी कागदपत्रे

Next

भिवंडी : तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत सुपेगावमधील माजी सरपंच रोहिदास मढवी व सदस्य रोहिणी मढवी या दाम्पत्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक राऊत यांनी जिल्हाधिकाºयांकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.
शहापूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासींच्या सामूहिक विवाहामध्ये कन्यादान योजना राबवली जाते. मढवी दाम्पत्याचे लग्न ३ फेब्रुवारी २००४ मध्ये झाले. त्यांच्या विवाहाची ही नोंद सुपेगाव ग्रामपंचायतीतील रजिस्टरमध्ये केली आहे. तसेच त्यांना नयन व हर्षाली ही दोन मुले आहेत. तरी देखील या दाम्पत्याने कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ मार्च २०१२ मध्ये सामूहिक सोहळ्यात सहभागी होऊन याच दिवशी लग्न झाल्याचे कागदोपत्री सत्यप्रतिज्ञापत्र (अ‍ॅफिडेव्हीट) प्रकल्प अधिकाºयांकडे सादर करून या योजनेमार्फत मिळणारा आर्थिक फायदा घेतला.
रोहिदासची बहीण व माजी ग्रामपंचायत सदस्या कलावती मढवी यांचे लग्न पुंडासच्या स्वप्नील भोईर यांच्याशी २००७ मध्ये झाले असून केवळ कन्यादान योजनेचा लाभ घेण्याच्या उद्देशाने त्याची नोंद सुपेगाव ग्रामपंचायत रजिस्टारमध्ये आॅक्टोबर २०११ मध्ये करण्यात आली आहे. तसेच त्यांनी १८ मे २०१२ मध्ये सामूहिक सोहळ्यात सहभागी होऊन या दिवशी लग्न झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या दाम्पत्यांनी सत्यप्रतिज्ञापत्रात लिहून दिल्याप्रमाणे दंडनीय कारवाई करावी,अशी मागणी राऊत यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

Web Title: False documents submitted for the scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.