कचऱ्यापासून खतनिर्मिती करून फुलविली बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:37 AM2019-05-22T00:37:43+5:302019-05-22T00:37:52+5:30
चेंबूर येथील रहिवाशाचा उपक्रम : १५ वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश
मुंबई : मुंबईत दररोज ९ हजार मेट्रिक टन निर्मिती होते. या कचºयाासाठी डम्पिंग ग्राऊंडवर जागा शिल्लक नाही. या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने कचरा विलगीकरण मोहीम राबविली. त्यानंतर कचºयात घट होऊन ७ हजार मेट्रिक टन झाले. परंतु याच कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकर घेत चेंबूर येथील रहिवाशी संजू काळे यांनी १५ वर्षांपूर्वीच खतनिर्मिती प्रकल्प सुरु केला आहे. या खतापासून बाग फुलविण्यात आली आहे़ भाजीपाला तसेच फळझाडे लावण्यात आली आहे.
काळे यांनी टिळक नगर येथे गेल्या १५ वर्षांपासून गीत गोविंद सोसायटीमध्ये खतनिर्मिती प्रकल्प सुरू आहे. त्यांनी ह्यमिस्टर ब्लॅक वेस्ट मॅनेजमेंट फाऊंडेशनह्णच्या माध्यमातून ह्णएमह्ण पश्चिम विभागातील आठ इमारतींमध्ये खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे.एवढेच नव्हे तर याखतापासून भाजीपालाही पिकविला जात आहे. पालक, मेथी, पपई, मिरची, आले,वांगी , कोथिंबीर, कडिपत्ता,भुईमूग ते पूर्णपणे सेंद्रिय खतापासून ते तयार करतात. काही शाळांमधील शालेय विद्याथीर्ही या शेतीला शैक्षणिक भेट देत असतात, तर सध्या काही वसाहतीत ओल्या कचºयापासून खतनिर्मिती केली जाते. या व्यतिरिक्त वडाळा येथेही संस्थेचे खतनिर्मिती प्रकल्पावरील काम चालू आहे.
केवळ टिळक नगरमध्ये ही संस्था जवळ जवळ एका महिन्यात आठ ते दहा टन इतक्या ओल्या कचºयाचे व्यवस्थापन करून खतनिर्मिती करत आहे. एकट्या टिळक नगरमध्ये जर सर्व रहिवाशी संकुलांनाीहा प्रकल्प चालू केल्यास साधारणत: १६० इमारतींमधील एका महिन्यात १००० ते १६०० टन एवढा ओल्या कचºयाची खतनिर्मिती करता येऊ शकते. जागा नसल्यास गच्चीवरही हा प्रकल्प उभारला जाऊ शकतो. पण, सध्या काळे यांनी कोणालाही या कचºयापासून तयार झालेल्या खतांची विक्री केली नसून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कशी व्यवस्था करता येईल, ते याच्या शोधात आहेत. त्यासाठी जवळच्या परिसरात पालिकेने एखादी जागा उपलब्ध करून दिल्यास खूप चांगल्यारीतीने व्यवस्थापन करणे शक्य होईल, असे काळे सांगतात. तसेच रहिवाशांनी जर विश्वास ठेवला व साथ दिली तर टिळक नगर, चेंबूर व मुंबई, कचरा मुक्त नव्हे, तर धूळमुक्त होऊ शकेल, असा विश्वासही काळे यांनी व्यक्त केला.
मुंबईतील कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. एकावर एक ढीगामागून ढीग रचले जातात. कुठेच या कचºयाला श्वास घेता येत नाही व मग अधूनमधून यातून मिथेन वायू निर्माण होऊन या ढिगा?्याला आगी लागतात व प्रदूषणात भर पडते. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यापासून खतनिर्मिती हा पर्याय पुढे आला आहे. त्यासाठीच मी झटत आहेत. परंतु, खत विकत घेण्यासाठी कोणी पुढे येत नाही
- संजू काळे, सामाजिक कार्यकर्ते