एकत्र कुटुंबाची विण झाली घट्ट, कोरोना काळात कौटुंबिक संवादात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 03:33 AM2020-05-15T03:33:41+5:302020-05-15T03:33:41+5:30
कोरोनामुळे ओढवलेली बिकट परिस्थिती आणि सुमारे पावणेदोन महिने एकत्र घालविल्यानंतर अनेक वर्षांपासून कौटुंबिक नात्यांमधील दुराव्याची भिंत जमीनदोस्त झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या नात्यांमधील कटुतेच्या तीव्रतेत घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे.
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउनचा आधार घेतला असून मागील पावणेदोन महिने नागरिकांना सक्तीने घरी बसावे लागले. या काळात अनेकांना रोजगाराला मुकावे लागले असून आर्थिक कळ सोसावी लागत आहे. एका बाजूने ही झळ सोसताकोरोनामुळे ओढवलेली बिकट परिस्थिती आणि सुमारे पावणेदोन महिने एकत्र घालविल्यानंतर अनेक वर्षांपासून कौटुंबिक नात्यांमधील दुराव्याची भिंत जमीनदोस्त झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या नात्यांमधील कटुतेच्या तीव्रतेत घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे.ना दुसरीकडे मात्र एवढा मोठा कालावधी एकत्र घालविल्यानंतर कुटुंबीयांमधील संवाद वाढून वातावरण सकारात्मक बनल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
पालघर जिल्हा हा मुंबई आणि उपनगराला लागून असल्याने ग्रामीण भागातील शिकलेले लोक शहरात वास्तव्यास गेले, काहींनी शेती सोडून औद्योगिक वसाहतीत नोकरी स्वीकारली. स्थानिक नोकरीकरिता ये-जा करू लागले. चर्चगेट ते डहाणू लोकल सेवा सुरू झाल्यानंतर हे प्रमाण कमालीचे वाढले. दरम्यान आर्थिक सुबत्ता आणि शहरी मानसिकतेमुळे भावकीतील दुरावा वाढला. शेती करणाऱ्या कुटुंबातील सदस्याला कमी लेखले जाऊ लागल्याने अबोला, भांडणाच्या प्रसंगात वाढ झाली. शेजाºया-शेजाऱ्यांमध्येही विसंवाद वाढलेला दिसला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाउन अमलात आणल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले. यामुळे एकटेच राहणाºयांचा दिवस जाता जाईना. तर दुसºया टप्प्यातील लॉकडाउनमध्ये शेतकºयांना शेतमाल निर्यात आणि कृषी कामासाठी बाहेर पडता येऊ लागल्याने शेतकºयांचे महत्त्व वाढले. त्यामुळे इच्छा नसली तरी गरज म्हणून शेतरस्ता विसरलेल्यांची पावले वडिलोपार्जित शेतजमिनीकडे वळू लागली.
पूर्वी कौटुंबिक वादामुळे शिवारातील करवंद, धामनं, ताडगोळे, आंबा, चिंचा, बोकरं, काजू अशा रानमेव्याची नासाडी व्हायची, मात्र आता संपूर्ण कुटुंब गुण्यागोविंदाने त्याचा आस्वाद घेऊ लागली आहेत. या मनोमीलनामुळे ओस पडलेल्या शेतीच्या तुकड्यांवर भावंडांनी एकत्रित येऊन कुंपण घातल्याने शेतीचे महत्त्व अधोरेखित झाल्याची उदाहरणे गावागावातून पाहायला मिळत आहेत. ही तेढभावना कमी झाल्याने आगामी खरीप हंगामात जिल्ह्यातील भात पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार असून शेतीला सुगीचे दिवस आल्याची सकारात्मकता कृषीभूषण यज्ञेश सावे यांनी बोलून दाखवली आहे.
लॉकडाउनमुळे एकलकोंडे जीवन जगलेल्यांना एकत्र कुटुंबाचे महत्त्व उमगले आहे. मनातील दुराव्यामुळे जमिनीवर ओढण्यात आलेली तेढीची रेषा पुसट बनल्याने आगामी खरीप हंगामात त्याचा सकारात्मक बदल शेती क्षेत्रातून नक्कीच दिसून येईल.
- कृषिभूषण यज्ञेश सावे