कल्याणचा प्रसिद्ध गिर्यारोहक प्रशिल अंबादे यांने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर फडकवला तिरंगा
By मुरलीधर भवार | Published: November 23, 2023 06:50 PM2023-11-23T18:50:21+5:302023-11-23T18:53:39+5:30
Kalyan News: कल्याणमध्ये राहणारे प्रसिद्ध गिर्यारोहक प्रशिल जयदेव अंबादे यांने १३ दिवसापर्यंत चाललेल्या भारत नेपाल मोहिमे अंतर्गत एवरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा फडकवला आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याणमध्ये राहणारे प्रसिद्ध गिर्यारोहक प्रशिल जयदेव अंबादे यांने १३ दिवसापर्यंत चाललेल्या भारत नेपाल मोहिमे अंतर्गत एवरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा फडकवला आहे. या मोहिमेमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्य महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक आणि दिल्ली येथील आठ गिर्यारोहकांनी सहभाग घेतला होता.
प्रशिल अंबादे यांने या मोहिमे अंतर्गत जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्टच्या बेस कॅम्प ज्याची समुद्र सपाटीपासून उंची १७ हजार ५९८ फूट आहे. या जागेवर पोहोचून तिरंगा फडकवला. प्रशिलने सांगितले की तेरा दिवस चाललेल्या या मोहिमेमध्ये कमी वायुदाब, कमी ऑक्सिजन,लांबवर पसरलेले रस्ते अन उपलब्ध पाणी अशा अनेक कठीण परिस्थितीला पार करत समोर जावे लागले.
प्रशिलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचून लोकांना पृथ्वीवर वाढत्या तापमानामुळे ग्लेशर वितळून होणाऱ्या नुकसानाबद्दल माहिती दिली. लोकांना स्वच्छतेचा संदेश देत जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी आवाहन केले. जेणेकरून येणाऱ्या काळात वाढत्या तापमानामुळे वितळणाऱ्या ग्लेशरला आपण वाचवू शकतो.
या मोहिमेदरम्यान प्रशिल अंबादे यांनी वृक्षतोडीकरण जागतिक तापमान वाढ होऊन पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम याबाबत चिंता व्यक्त केली. वाढत्या तापमानाला कमी करण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव मार्ग असे त्याने सांगितले. प्रशिल हा कल्याणचा रहिवासी असल्याने देशातील नागरीकांसह कल्याणकरांना त्याचा रास्त अभिमान आहे.