रसिकांनी घेतला ऑनलाइन मैफलीचा आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:38+5:302021-07-26T04:36:38+5:30
ठाणे : कलेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात आजही गुरू - शिष्याची परंपरा जोपासली जाते. याच परंपरेनुसार पेंडसे ...
ठाणे : कलेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात आजही गुरू - शिष्याची परंपरा जोपासली जाते. याच परंपरेनुसार पेंडसे म्युझिक अकॅडमीमार्फत नुकतीच गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
सुरुवातीला विद्यार्थ्यांनी हार्मोनियम आणि व्हायोलीनवर निरनिराळ्या रागांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाची उत्सुकता वाढवत सूरमणी मोहन पेंडसे यांच्या वादनाला सुरुवात झाली. जयंत मल्हार राग, त्यानंतर बंदिश पेश करून गुरुवर्य पेंडसे यांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली. भैरवी रागाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
ठाण्यातील तबलावादक पं. शेखर सुपटकर यांनी उत्तमरीत्या साथ देऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. विशेष म्हणजे कोविडच्या या काळात सर्व नियमांचे पालन करून गुरुपौर्णिमेची ही भेट फेसबुकच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहचविण्यात आली. अनेक रसिकांनी याचा आस्वाद घेत आपली उपस्थिती दिली.
-------------------