शेतकरी आले रस्त्यावर; आठवडे बाजार झाला कायमचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:22 AM2019-03-11T00:22:56+5:302019-03-11T00:23:13+5:30
सरकारने सुरू केलेला शेतकरी आठवडा बाजार भाईंदर पालिकेने मीनाताई ठाकरे मंडईतील हॉलच्या कंत्राटदाराचा फायदा व्हावा यासाठी कायमचा बंद केला.
मीरा रोड : सरकारने सुरू केलेला शेतकरी आठवडा बाजार भाईंदर पालिकेने मीनाताई ठाकरे मंडईतील हॉलच्या कंत्राटदाराचा फायदा व्हावा यासाठी कायमचा बंद केला. पालिकेने तसे पत्रच काढल्याने रविवारी नाशिकहून आलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावले. यामुळे त्यांना रस्त्यावर बसून भाजी विकण्याची वेळ आली.
रामदेव पार्कमागील ठाकरे मंडई व हॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या आधीपासून मुख्यमंत्र्यांच्याच संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार योजने अंतर्गत पणन विभागाच्या मंजुरीने येथे दर रविवारी शेतकरी आठवडे बाजार भरत होता. परंतु पालिकेने मंडई आणि शॉपिंग सेंटरच्या आरक्षणात बेकायदा हॉल बांधून तळ मजल्यावरील मंडई व दुकानेही कंत्राटगारास दिल्यापासून आवारातील मोकळ्या जागेत बसणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्याने हुसकावुन लावण्याचा खटाटोप पालिका आणि सत्ताधारी भाजपाने चालवला होता. त्यासाठी आयुक्तांनी बांधकाम विभागाचा प्रस्ताव महापौर डिंपल मेहतांकडे दिल्यावर त्यांनी महासभेत आणला व शेतकरी आठवडे बाजार बंद करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला. ठराव झाल्यानंतर कंत्राटदार तसेच पालिकेने गेल्या रविवारीही शेतकºयांना हुसकावून लावले होते.
गेल्या शुक्रवारी तर कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी पत्र काढून ठाकरे मंडईतील बाजार बंद करावा असा फतवा शेतकºयांना काढला. त्यामुळे रविवारी पहाटे नाशिकहून आलेल्या शेतकºयांना पालिकेने आवारात घेतलेच नाही. त्यामुळे बिचाºया शेतकरयांना रस्त्यावरच आपला आणलेला भाजीपाला विकण्यास बसण्याची वेळ आली. परंतु येथील स्थानिक रहिवाशांसह विविध संघटनांनी मात्र शेकतºयांचा आठवडे बाजार बंद करू नये अशी मागणी सातत्याने चालवली आहे. चांगला आणि माफक दरात भाजीपाला मिळत असताना कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आठवड्याच्या अर्ध्या दिवसाकरिताही जागा पालिका व सत्ताधारी शेतकºयांना देत नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
पालिकेने पदपथावर दिली शेतकºयांना जागा
एकीकडे पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करायचे असताना पालिकेने चक्क शेतकºयांना कनकिया व मॅक्सस मॉल येथे पदपथावर जागा दिली आहे.