शेतकऱ्याने केले भातझोडणी यंत्र विकसित
By Admin | Published: November 28, 2015 01:01 AM2015-11-28T01:01:26+5:302015-11-28T01:01:26+5:30
भातकापणी यंत्रानंतर प्रतिक्षा असते ती ती भातझोडणी यंत्राची. हेच यंत्र शहापुरात एका शेतकऱ्याने विकसित केले आहे. वेंदवड येथे राहणारे नागेश भांगरे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला
जनार्दन भेरे, भातसानगर
भातकापणी यंत्रानंतर प्रतिक्षा असते ती ती भातझोडणी यंत्राची. हेच यंत्र शहापुरात एका शेतकऱ्याने विकसित केले आहे.
वेंदवड येथे राहणारे नागेश भांगरे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. शेतावर अनेक प्रकारच्या कला विकसित करत असतानाच फॅब्रिकेशनच्या आवडीमुळे त्यांना भातझोडणी यंत्राची कल्पना सुचली.
एक लोखंडी सांगाडा तयार करून वायनल प्लेट तयार करून पॅडस्टल बेअरिंग,लोखंडी रॉड, फॅब्रिकेशन बुश्ािंग यांची मदत घेऊन साडेतीन मीटर उंचीचे सव्वादोन मीटर लांबी असलेले शाफ्ट तयार करून त्याला दीड हॉर्स पॉवरची विजेची
मोटर बसवून त्यांनी यंत्र तयार केले आहे.
एका भाऱ्याच्या झोडणीसाठी १२ ते १५ रुपये मजुरी मोजावी लागत असून या यंत्रावर १० भारे झोडण्यासाठी अर्धातास लागतो ३ ते ४ युनिट इतकीच वीज खर्च होते. वेळ, पैसा, मजुरी बचत करून केवळ २० ते २५ हजार रुपये खर्च येणारे हे यंत्र शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. कृषी अधिकारी विलास झुंजारराव विस्तार अधिकारी दिनेश घोलप, शिवराम भोये यांच्या मार्गदर्शनामुळे हे यंत्र विकसित करण्यात यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे भातशेतीच्या यांत्रिकीकरणाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.