शेतकरी दादा, पटकन फॉर्म भरा अन् थायलंड, पेरू, ब्राझीलचा दौरा करा!

By सुरेश लोखंडे | Published: January 30, 2024 05:33 PM2024-01-30T17:33:29+5:302024-01-30T17:34:14+5:30

यंदा शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेचे आयोजन राज्य शासनाच्या कृषी आयुक्तालयाने केले आहे.

Farmer , quickly fill out the form and visit Thailand, Peru, Brazil! | शेतकरी दादा, पटकन फॉर्म भरा अन् थायलंड, पेरू, ब्राझीलचा दौरा करा!

शेतकरी दादा, पटकन फॉर्म भरा अन् थायलंड, पेरू, ब्राझीलचा दौरा करा!

ठाणे : शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. विविध देशांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, त्यातून उत्पन्नात घेतलेली वाढ आदींचा अभ्यास करूनत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटी झत्यादी द्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता शेतकऱ्यांचे परदेशी अभ्यास दाैऱ्याचे आयाेजन करण्यात आलेले आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले परिपूर्ण अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये २ फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष जमा करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले आहे.

यंदा शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेचे आयोजन राज्य शासनाच्या कृषी आयुक्तालयाने केले आहे. या दौऱ्यासाठी जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लैंड, ऑस्ट्रीया, न्युझीलँड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरु, ब्राझिल, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापुर इत्यादी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे. या दोऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात येत आहे. त्यासाठी दिलेल्या निकषास अनुसरून तत्काळ अर्ज दाखल करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. या अभ्यास दौऱ्याकरीता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. चालू कालावधीसाठी त्याचे नांवे ७/१२ व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्याचे मुख्य उत्पादनाचे साधन शंती असाचे, कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी हा किमान बारावी पास असावा ,वय २५ वर्ष पूर्ण असाचे व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे आदी निषक या अभ्यास दाैऱ्यासाठी निश्चित करण्यात आलेले आहे.

Web Title: Farmer , quickly fill out the form and visit Thailand, Peru, Brazil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी