शेतकऱ्यांनाे आता रब्बीच्या पिकांचा ‘ई पीक पेरा’ माेबाईल ॲपवर नाेंद करा - माने

By सुरेश लोखंडे | Published: November 7, 2023 06:35 PM2023-11-07T18:35:13+5:302023-11-07T18:36:03+5:30

Thane: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई मिळण्यासाठी, याशिवाय शेतातील पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटपासह पीएम किसान योजना, यांत्रिकीकरण योजना आदी शासनाच्या विविध योजनाच्या लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकरी खातेदाराने पीक ‘पेरा ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंद करणे आवश्यक आहे.

Farmers can now register rabi crops on 'e Peak Pera' mobile app - Mane | शेतकऱ्यांनाे आता रब्बीच्या पिकांचा ‘ई पीक पेरा’ माेबाईल ॲपवर नाेंद करा - माने

शेतकऱ्यांनाे आता रब्बीच्या पिकांचा ‘ई पीक पेरा’ माेबाईल ॲपवर नाेंद करा - माने

- सुरेश लोखंडे  
ठाणे - नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई मिळण्यासाठी, याशिवाय शेतातील पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटपासह पीएम किसान योजना, यांत्रिकीकरण योजना आदी शासनाच्या विविध योजनाच्या लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकरी खातेदाराने पीक ‘पेरा ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंद करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे आताही या रब्बी हंगामाचा ‘ई पीक पेरा’ नोंदीला सुरूवात झाली असून १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. यास अनुसरून ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तत्काळ, आजच मोबाईलमध्ये ‘ॲप डाऊनलोड करून ही ई पीक पाहणी नाेंद करावी, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

 शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयंम घोषणापत्र घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येईल. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, नुकसान भरपाई मदत व किमान आधारभुत किंमतीनुसार खरेदीच्या लाभाकरिता शेतकऱ्यांनी आजच ई पिकांची नोंद मोबाईल ॲपद्वारे करावी, असे माने यांनी केले आहे. गेल्या वर्षीच्या ॲपमध्ये सुधारणा करून नवीन सुविधायुक्त अॲप (२.०.१४) यावर्षी सुरू केले आहे. नवीन सुविधांमध्ये विविध सुविधांचा समावेश आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे नोंदवलेली ‘ई-पीक पाहणी’ ४८ तासांमध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येणार आहे.

गेल्या वर्षीच्या ॲपमध्ये सुधारणा करून नवीन सुविधायुक्त अँप  (२.०.१४) यावर्षी सुरू करण्यात आलेले  आहे. नवीन सुविधांमध्ये पुढील सुविधांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवलेली पीक पाहणी ४८ तासांमध्ये स्वतःहून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल. किमान आधारभूत योजनेंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी नोंदणी केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार आहे. त्याआधारे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयंम घोषणापत्र घेतले जाणार असून शेतकऱ्यांनी केलेली पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येईल. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. तलाठी पडताळणीअंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिंबित होतील.

Web Title: Farmers can now register rabi crops on 'e Peak Pera' mobile app - Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.