कृषी खाते बेफिकीर तर शेतकऱ्यांना रोगांची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:48 AM2018-09-19T03:48:45+5:302018-09-19T03:49:01+5:30

जिल्ह्यातील ७५०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली असून खोडकीडा, निळा भुंगेरा आदी आदींचा प्रादुर्भाव नुकसानीच्या आत असल्याचे जिल्हा कृषी विभागाने सांगितले.

Farmers fear food poisoning and farmers are afraid of diseases | कृषी खाते बेफिकीर तर शेतकऱ्यांना रोगांची भीती

कृषी खाते बेफिकीर तर शेतकऱ्यांना रोगांची भीती

Next

- हितेंन नाईक

पालघर : जिल्ह्यातील ७५०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली असून खोडकीडा, निळा भुंगेरा आदी आदींचा प्रादुर्भाव नुकसानीच्या आत असल्याचे जिल्हा कृषी विभागाने सांगितले. मात्र काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळत असल्यातरी निर्माण झालेल्या दमट वातावरणामुळे अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकºयामधून व्यक्त केली जात आहे. तर जिल्ह्यातील सर्व धरणे पाण्यानी भरलेली आहेत.
जिल्ह्यात १ लाख ७ हजार १७६ हेक्टर क्षेत्र हे लागवडी खालील क्षेत्र असून भातपिकाचे सरासरी लागवड क्षेत्र ७६ हजार ३८८ हेक्टर आहे. त्यापैकी ७५ हजार २१.४४ हेक्टर क्षेत्रावर पुर्नलागवड (९८.२१ टक्के) करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे नागली पिकाचे सरासरी क्षेत्र ११ हजार २०५ हेक्टर असून १२ हजार १७१.६३ टक्के (१०९ टक्के) क्षेत्रावर पुनर्लागवड करण्यात आली आहे. उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र ३ हजार ५९६ हेक्टर असून ३०३९.८८ हेक्टर क्षेत्रावर (८४.५४ टक्के) पेरणी झाली आहे. तूर पिकाचे सरासरी क्षेत्र २ हजार ५४६ हेक्टर असून २ हजार ४४१.८८ हेक्टर क्षेत्रावर (९५.९१ टक्के) क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात पडणारा सरासरी वार्षिक पाऊस २५७७.८० मिमी.एवढा आहे. माहे जून महिन्याची पावसाची सरासरी ४२६.०० मिमी होती. त्या तुलनेत जून महिन्यात ६८७.०० मिमी एवढा पाऊस पडलेला आहे. जुलै महिन्याच्या पावसाची सरासरी १०४७.८० मिमी असून आज अखेर १६५३.७३ मिमी इतका पाऊस पडलेला आहे. आॅगस्ट महिन्याची पावसाची सरासरी ६२६.८० मिमी असून आज अखेर २७६.६० मिमी पाऊस (४४.१० टक्के) पडला आहे.
सूर्या या मोठ्या प्रकल्पांतर्गत धामणी, कवडासची क्षमता २८६.३१ द.ल.घ.मी. असून ते पूर्ण भरलेले आहेत. वांद्री मध्यम प्रकल्पात ३५.९३८ द.ल.घ.मी पाणीक्षमता असून ते ही पूर्ण भरलेले आहे. तर जिल्ह्यात एकूण ६ लघु पाटबंधारे असून त्या पालघर तालुक्यात माहीम केळवे, मनोर आणि देवखोप. विक्रमगड तालुक्यात मोहखुर्द व खांड तर डहाणू तालुक्यातील रायतळे यांचा समावेश असून ही सर्व धरणे पूर्ण भरली आहेत.
भात रोपांची पुनर्लागवड नुकतीच झाली असून रोपास फुटवे येत आहेत. जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलेल्या क्रॉपसॅप सर्वेक्षणानुसार पालघर तालुक्यातील माण, वाडा तालुक्यातील गारगाव, जव्हार तालुक्यातील गोरठन तर डहाणू तालुक्यातील भराड येथील काही शेतकºयाच्या शेतात खोडकीडा, निळा भुंगेराचे प्रमाण आढळून आले असून ते नुकसान पातळीच्या आत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील नाईक यांनी दिली. मात्र जिल्ह्यात कुठेही करपा रोगाची लागण झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून पावसात खंड पडला असला तरी पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचेही त्यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Farmers fear food poisoning and farmers are afraid of diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.