पालघर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 01:13 AM2020-06-15T01:13:34+5:302020-06-15T01:13:44+5:30

शेती साहित्य खरेदीसाठी झुंबड : शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर गर्दी

Farmers in Palghar district ready for kharif season | पालघर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज

पालघर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज

googlenewsNext

पालघर/पारोळ : यंदा रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रात पावसाने हलकी सुरुवात केल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाले असून त्यांनी भातपेरणीला सुरुवात केली आहे. मात्र दोन दिवसांपासून ऊनही पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वसई तालुक्यासह जिल्ह्यात सर्वात जास्त घेण्यात येणाºया भातपिकाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. पेरणीसाठी लागणारी बियाणे म्हणून भाताच्या वाणासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकºयांची या भागातील कृषी सेवा केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे. तसेच नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने लागलीच मिळावे म्हणून ट्रॅक्टरमालकाकडे खेटे मारणे सुरू झाले असून लगेच ट्रॅक्टर मिळावा म्हणून शेतकरी प्रयत्नशील आहेत.

चालू वर्षाच्या खरीप हंगामाला तालुक्यात सुरुवात झाली असून पेरणीसाठी लागणारी सुधारित व संकरित भातबियाणे, खते, औषधे यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र चालू वर्षी दरसाल वाढणाºया महागाईचा परिणाम जाणवत असून खते, बियाणे, औषधे यांच्यासह लागणारी अवजारे नांगरणीसाठी ताशी भाड्याने घेण्यात येणारे ट्रॅक्टर यांचे साधारण ५ ते १५ टक्के भाव वाढले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत भातबियाण्यांच्या १० किलोच्या एका पिशवीचा असलेला दर चालू वर्षी ५० रुपयांनी वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाढती महागाई, मजुरांची टंचाई, वरुणराजाची खप्पामर्जी, रोगराई यांचा सामना करून लागवड केलेली शेती पिकली तरी पिकाला मिळणारा भाव यांची सांगड घालताना वरील कारणांमुळे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी भातशेती न परवडणारी असून दुसरे काही उत्पन्नाचे साधन नसल्याने खोट खाऊन भातशेती कसावी लागत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. पण, या वर्षी कोरोनाचे सावट असताना लावणीसाठी डहाणू, जव्हार, मोखाडा या ठिकाणाहून भातलावणीसाठी येणाºया मजुरांची टंचाई होणार असल्याचे वसईतील आडणे येथील शेतकरी लक्ष्मी प्रसाद पाटील यांनी सांगितले.

Web Title: Farmers in Palghar district ready for kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी