आधार क्र मांक नसलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आधारनोंदणी करावी - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 06:47 PM2020-01-02T18:47:16+5:302020-01-02T18:50:45+5:30
ठाणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. ...
ठाणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. आधार क्र मांक हा लाभार्थी निश्चित करण्याचा मुख्य निकष आहे. यामुळे अद्याप ज्या पात्र शेतकऱ्यांकडे आधार क्र मांक नाही, त्यांनी तातडीने आधारनोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यास आधारलिंक केलेले नाही अथवा ज्यांच्या कडे आधार क्र मांक नाही , अशा शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तात्काळ आधार लिंक करणे गरजेचे आहे. मात्र ज्यांच्याकडे आधारक्र मांक नाही, त्यांनी आधार नोंदणी प्रक्रि या पूर्ण केल्यानंतरच संबंधीत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंमध्ये अल्पमुदत पीक कर्ज व पुनर्गठीत कर्ज यांचा समावेश आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वितरीत केलेले कर्ज, ३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत व परतफेड न केलेले कर्ज यांचा दोन लाख रूपये मर्यादेत समावेश आहे. कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्या खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन/फेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह थकबाकीची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असेल, अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत. या साठीची अधिक माहितीसाठी असलेला शासन निर्णय संकेत स्थळावर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.