शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वाटले जाणार ९० कोटींचे पीक कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:36 PM2019-06-01T23:36:56+5:302019-06-01T23:37:15+5:30
हंगामासाठी कृषीयंत्रणा सज्ज, खते, बियाणे देण्याचे नियोजन
ठाणे : शेतकऱ्यांना यंदाचे खरीप पीक घेण्यासाठी जिल्ह्यातील बँकांकडून ९० कोटी रुपये खरीप पीककर्जवाटप केले जाणार आहे. यापैकी आतापर्यंत २३ कोटी रुपये कर्जवाटप झाल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी घेतलेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी विभागाने स्पष्ट केले. यावेळी कृषीरथास पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. हा रथ ८ जूनपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
येथील जिल्हा नियोजन सभागृहात ही खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, पांडुरंग बरोरा आदी आमदारांसह पालक सचिव गवई, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे आदींना कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी यंदाच्या कृषी हंगाम योजनांचे पे्रझेंटेशन केले. शेतकºयांना पीककर्जवाटपासाठी ९० कोटी रुपयांचे नियोजन टीडीसीसी बँकेसह सहकारी बँका, खाजगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी केल्याचे नमूद करण्यात आले.यंदा ६५ हजार हेक्टर शेतजमिनीवर खरीप हंगाम घेतला जाणार आहे. त्यापैकी ५९ हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड होईल. उर्वरित वरी, नागली, कडधान्यांची लागवड होईल. यासाठी १० हजार क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले आहे.
त्यापैकी पाच हजार ९०० क्विंटल सुधारित व संकरित बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. तर, १४ हजार मेट्रिक टन खताचे यंदा नियोजन केले आहे. यावेळी बियाण्यांचे १५६ सॅम्पल काढण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप होताच त्यांचे सॅम्पल घेण्यासाठी ठिकठिकाणी यंत्रणा सतर्क केली आहे. १२६ शेतीशाळांचे नियोजन केले आहे. भातलावणीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांचे वर्ग या शेतीशाळेत चालणार आहे. यासाठी जिल्ह्यात १०८ कृषी सहायक तैनात आहेत.
सर्वाधिक वित्तपुरवठा जिल्हा बँकेकडून
यंदा वाटप करण्यात येणाºया ९० कोटींपैकी २० कोटींचा वित्तपुरवठा आधीच झालेला असून आता २३ कोटींपर्यंत शेतकºयांना तो होऊ घातला आहे. आतापर्यंत १४ टक्के वित्तपुरवठा पीककर्जापोटी शेतकºयांना झाल्याचे नमूद करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक वित्तपुरवठा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके द्वारे होत असून ६० हजार प्रतिहेक्टर पीककर्ज शेतकºयांना दिले जात असल्याचे माने यांनी निदर्शनास आणून दिले.