फेरीवाल्यांवर कारवाईचा फार्स

By admin | Published: August 18, 2016 05:13 AM2016-08-18T05:13:48+5:302016-08-18T05:13:48+5:30

फेरीवाल्यांच्या अतिक्रमणापुढे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने नांगी टाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू असल्याचा दावा नेहमीच महापालिकेतर्फे

FARS OF ACTION ON FERRAL | फेरीवाल्यांवर कारवाईचा फार्स

फेरीवाल्यांवर कारवाईचा फार्स

Next

कल्याण : फेरीवाल्यांच्या अतिक्रमणापुढे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने नांगी टाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू असल्याचा दावा नेहमीच महापालिकेतर्फे केला जात असला तरी हा कारवाईचा ‘दिखावा’ सत्ताधारी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्यासमोरच उघड झाला आहे. शनिवारच्या महासभेत हा मुद्दा मांडण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कारवाईचा दिखावा चांगलाच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
कल्याण पश्चिमेकडील स्कायवॉक असो अथवा रेल्वेस्थानक लगतचा परिसर तेथे फेरीवाल्यांनी सर्रात्र अतिक्रमण केले आहे. हीच परिस्थती डोंबिवली रेल्वेस्थानक परिसराची आहे. त्यामुळे प्रभाग अधिकाऱ्यांकडून केले जात असलेले कारवाईचे दावे पुरते फोल ठरले आहेत. ‘लोकमत’ने ‘आॅन द स्पॉट’च्या माध्यमातून हफ्तेखोरीमुळे या फेरीवाल्यांना अभय कसे मिळते, यावर प्रकाश टाकण्यात आला होता. याची गांभिर्याने दखल घेत आयुक्त ई. रवींद्रन यांनी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, या उपरही फेरीवाला कारवाईचा फार्स सुरूच आहे. याचा प्रत्यय शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक राणे यांना मंगळवारी आला. राणे सायंकाळी डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरात आले असता मोठ्या प्रमाणावर फेरीवाले रस्ते अडवून बसल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे घटनास्थळी फेरीवाला अतिक्रमण विरोधी पथकाचे वाहन आणि कर्मचारीही उपस्थित होते. राणे यांनी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता कारवाई सुरू असल्याचे थातूरमाथूर उत्तर त्यांना संबंधितांनी दिले. परंतु, कोणतीही कारवाई होत नसल्याचे तसेच फेरीवाले बिनदिक्कतपणे आपला व्यवसाय करत असल्याचे राणे यांना दिसले. त्यांनी याप्रकरणी पथकप्रमुख रवींद्र गायकवाड यांच्याबाबत विचारणा केली असता ते देखील घटनास्थळी हजर नव्हते. (प्रतिनिधी)

राणे यांनी या ‘दिखावा’ कारवाईची चित्रफित काढली आहे. ती शनिवारच्या महासभेत सादर केली जाणार आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच आयुक्तांना याप्रकरणी जाब विचारला जाणार आहे. महापौर यांनीही या दिखाऊगिरीची गंभीर दखल घ्यावी, असे राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: FARS OF ACTION ON FERRAL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.