ठाणे कारागृहात नवी मुंबईच्या ‘त्या’ शिक्षकाचे उपोषण सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 10:24 PM2017-09-06T22:24:00+5:302017-09-06T22:24:11+5:30

 न्यायालयातून जामीन मिळाला नाही आणि नवी मुंबई पोलिसांकडूनही आपल्या सुटकेसाठी प्रयत्न न झाल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात उपोषणाला बसलेल्या हरिश्चंद्र शुक्ला या कैदी शिक्षकाचे बुधवारी पाचव्या दिवशीही कारागृहात उपोषण सुरूच आहे.

The fasting of 'those' teacher of Navi Mumbai in Thane Prisons continues | ठाणे कारागृहात नवी मुंबईच्या ‘त्या’ शिक्षकाचे उपोषण सुरूच

ठाणे कारागृहात नवी मुंबईच्या ‘त्या’ शिक्षकाचे उपोषण सुरूच

Next

ठाणे, दि. 6 - आपल्यावरील बलात्काराचा आरोप खोटा असून त्याच संदर्भातील डीएनए अहवालही निगेटिव्ह आला आहे. तरीही न्यायालयातून जामीन मिळाला नाही आणि नवी मुंबई पोलिसांकडूनही आपल्या सुटकेसाठी प्रयत्न न झाल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात उपोषणाला बसलेल्या हरिश्चंद्र शुक्ला या कैदी शिक्षकाचे बुधवारी पाचव्या दिवशीही कारागृहात उपोषण सुरूच आहे.

न्यायालय आणि पोलीस यंत्रणेविरोधात ठाणे कारागृहातच या कैद्याने 2 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. त्याआधी 30 आणि 31 आॅगस्ट रोजी आपण उपोषण करणार असल्याचा इशारा त्याने दिला होता. तो ज्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होता, त्याच शाळेतील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच आरोपाखाली त्याला अटक झाल्यानंतर त्याचा मुंबई उच्च न्यायालयानेही जामीन नाकारला आहे. मात्र, आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा करून त्याने आपल्याला जामीन मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे कारागृहातील अधिकाºयांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ज्या काळात हा प्रकार घडला आहे, त्या वेळी माझे पती त्या शाळेत नव्हे, तर अन्य शाळेला नोकरीला होते, असा दावा या कैद्याची शिक्षिका पत्नी अंजली शुक्ला हिने केला आहे. ‘‘उपोषणाला बसलेले असल्यामुळे तो केवळ पाणी ग्रहण करत आहे. नियमानुसार त्याला नातेवाइकांची मुलाखत आणि न्यायालयाच्या सुनावणीसाठी बाहेर काढण्यास बंदी आहे. त्याच्या उपोषणाची ठाणे न्यायालय आणि जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनाही माहिती दिली असून त्याची कारागृहाच्या डॉक्टरांकडून तपासणीही करण्यात येत आहे.’’
नितीन वायचळ, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे

‘‘लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर संबंधित पीडित मुलीच्या गर्भाची आणि माझ्या पतीची डीएनए चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आहे. त्यामुळे आता यात नार्को किंवा कोणत्याही चाचणीला आम्ही तयार आहोत. गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या माझ्या पतीची तसेच मुलांनाही भेट दिली जात नाही. हे माणुसकीला धरून नाही. परंतु, पतीला न्याय मिळाला नाही, तर मीदेखील उपोषणाला बसेल.’’
अंजली शुक्ला (उपोषणकर्त्या कैद्याची पत्नी), नवी मुंबई

Web Title: The fasting of 'those' teacher of Navi Mumbai in Thane Prisons continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.