शिवसेना नगरसेविकेचे आजपासून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:43 PM2019-01-27T23:43:39+5:302019-01-27T23:43:54+5:30

मीरा-भाईंदर महापालिका प्रशासन सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली विकासकामांना खो घालत असल्याचा आरोप करत प्रभाग तीनमधील शिवसेनेच्या नगरसेविका नीलम ढवण उद्यापासून आयुक्त दालनाबाहेर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

Fasting from today's Shiv Sena corporation | शिवसेना नगरसेविकेचे आजपासून उपोषण

शिवसेना नगरसेविकेचे आजपासून उपोषण

googlenewsNext

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका प्रशासन सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली विकासकामांना खो घालत असल्याचा आरोप करत प्रभाग तीनमधील शिवसेनेच्या नगरसेविका नीलम ढवण उद्यापासून आयुक्त दालनाबाहेर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. तर कंत्राटी कामगारांसह स्थायी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासन चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी कामगार संघटना धरणे आंदोलन करणार आहे.

आरएनपी पार्क परिसरातील पालिका भूखंडावर खुली व्यायामशाळा व लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसविण्याच्या ढवण यांच्या नगरसेवक निधीतील कामाला प्रशासनाने मंजुरी दिली. भाजपा नगरसेवकांच्या पोटदुखीमुळे प्रशासनाने मात्र ती रद्द केली. ही जागा एका स्थानिक विकासकाच्या घशात घालण्याचे कटकारस्थान रचले जात असतानाही प्रशासन ढिम्म झाल्याचा आरोप ढवण यांनी केला आहे.
प्रशासन सत्ताधाºयांच्या दबावाखाली कारभार करत असून या गैरकारभाराविरोधात ढवण या आयुक्त दालनाबाहेर बेमुदत उपोषण करणार आहेत. मागील काही दिवसांपासून शिवसेना-भाजपामध्ये विविध विषयांवरून वाद सुरू आहेत. यामुळे विकासकामे होत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

आयुक्तांकडून समजवण्याचा प्रयत्न
आयुक्त बालाजी खतगावकर यांनी आंदोलने होऊ नयेत यासाठी ढवण व विवेक पंडित यांच्याशी संपर्क साधला. त्यांना प्रलंबित कामे व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असता आंदोलकांनी ते अमान्य करत आंदोलन छेडण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Fasting from today's Shiv Sena corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.