अंबरनाथच्या पाले गावाजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू
By पंकज पाटील | Updated: August 25, 2023 20:54 IST2023-08-25T20:54:13+5:302023-08-25T20:54:43+5:30
ट्रकच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले.

अंबरनाथच्या पाले गावाजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू
अंबरनाथ : बदलापूर - काटई महामार्गावर दुपारच्या सुमारास पालेगाव चौकात एका ट्रकने महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच मयत झाली आहे.
तरवींन कौर बिंद्रा असे या महिलेचे नाव आहे. ही महिला डोंबिवलीच्या एका खाजगी शाळेमध्ये टीचर म्हणून कार्यरत आहे. शाळा सुटल्यानंतर त्या आपल्या घरी दुचाकीवरून अंबरनाथकडे येत असताना पालेगाव चौकात त्यांना मागुण येणाऱ्या ट्रकने उडवले असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक आणि डंपर चालकला ताब्यात घेतले आहे. तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.