पूर्ववैमनस्यातून मुंब्य्रात जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:43 AM2021-09-18T04:43:21+5:302021-09-18T04:43:21+5:30
मुंब्राः पूर्ववैमनस्यातून जिवे मारण्याच्या हेतूने हल्ला करून पसार झालेल्या बापलेकांसह ऐकून सहा जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ...
मुंब्राः पूर्ववैमनस्यातून जिवे मारण्याच्या हेतूने हल्ला करून पसार झालेल्या बापलेकांसह ऐकून सहा जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.येथील अमृतनगर परिसरात राहत असलेल्या वहाब अन्सारी याची आई आणि वडिलांनी पूर्वी सरफराज आणि चुन्नू यांच्याविरोधात तक्रार केली होती. तेव्हापासून उभयंतामध्ये वारंवार वाद होत होते. याच पूर्ववैमनस्यातून सरफराज त्याची मुले इमरान र्फ इम्मु, सोहेल, समद तसेच अन्य तिघांनी जेऊन घरी चाललेल्या वहाब याच्या डोक्यावर आणि मानेवर कुऱ्हाडीने तसेच अन्य धारदार शस्त्राने गुरुवारी रात्री वार केले. यावेळी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केलेल्या इक्बाल शेख याच्याही कपाळाच्या उजव्या बाजूला वार करण्यात झाले. अन्सारी यांना उपचारांसाठी मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास तीव्र गतीने सुरू असून, हल्ला करून पसार झालेल्या आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी लोकमतला दिली.