क्षुल्लक कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला, अंबरनाथ चिंतामणी गणेश मंदिराजवळील घटना
By पंकज पाटील | Updated: October 2, 2023 19:26 IST2023-10-02T19:25:58+5:302023-10-02T19:26:16+5:30
या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.

क्षुल्लक कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला, अंबरनाथ चिंतामणी गणेश मंदिराजवळील घटना
अंबरनाथ : क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंबरनाथ पूर्व भागात घडली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.
अंबरनाथ पूर्व भागातील चिंतामणी गणेश मंदिराजवळ धर्मा उतेकर हे आपल्या कुटुंबीयांसह राहत आहेत. उतेकर हे एका खाजगी कंपनीमध्ये कामास आहेत. काम संपल्यानंतर ते आपल्या घरी आले होते. संध्याकाळच्या सुमारास धर्मा उतेकर हे आपल्या मुलाला घेण्यासाठी चिंतामणी गणेश मंदिरा जवळ आले असता याच ठिकाणी दत्ता साळवे हा धर्मा उतेकर यांच्या जवळ आला आणि तू माझ्या बायकोला आपल्या जुन्या भाडेकरूचा वाद का सांगितल याचा जाब विचारला. तसेच, या क्षुल्लक कारणावरून माझी बायको माझ्याशी बोलत नाही, असे म्हणत दत्ता साळवेने खिशातला चाकू काढून उत्तेकर यांच्या हातावर आणि मानेवर मारला आणि फरार झाला.
या हल्ल्यात धर्मा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत करत आहेत.