भिवंडीतील हॉटेलमध्ये बेछूट गोळीबार; सुरेश पुजारी टोळीचा हात असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:03 AM2018-01-11T01:03:12+5:302018-01-11T01:03:17+5:30

भिवंडी-कल्याण मार्गावरील रांजनोली गावाच्या हद्दीत असलेल्या के. एन. पार्कहॉटेलमध्ये बुधवारी दुपारी तिघांनी घुसून स्वागत कक्षात बसलेल्या महिलेवर बेछूट गोळीबार केला.

Fateful firing in Bhiwandi hotel; Suspected suspect of being part of Suresh Pujari gang | भिवंडीतील हॉटेलमध्ये बेछूट गोळीबार; सुरेश पुजारी टोळीचा हात असल्याचा संशय

भिवंडीतील हॉटेलमध्ये बेछूट गोळीबार; सुरेश पुजारी टोळीचा हात असल्याचा संशय

Next

भिवंडी : भिवंडी-कल्याण मार्गावरील रांजनोली गावाच्या हद्दीत असलेल्या के. एन. पार्कहॉटेलमध्ये बुधवारी दुपारी तिघांनी घुसून स्वागत कक्षात बसलेल्या महिलेवर बेछूट गोळीबार केला. हा गोळीबार सुरेश पुजारी टोळीने केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून घटनास्थळी गँगस्टर सुरेश पुजारीचा उल्लेख असलेली चिठ्ठी सापडल्याने शहरातील हॉटेलमालकांमध्ये घबराट पसरली आहे.
स्वरा रामचंद्र शिरसाठ (२५) असे जखमी तरुणीचे नाव आहे. ती हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील व्यवस्थापनाचे काम बघते. प्रिया शिंदे ही कामावर न आल्याने तिचे कामही स्वरा सांभाळत होती. दुपारी अचानक दोन बुरखाधारी हॉटेलमध्ये घुसले तर एक जण टेहाळणीसाठी दुचाकीवर कानटोपी घालून बसला होता. गोळीबारानंतर तिघांनी पळ काढला. या घटेनेचे चित्रीकरण हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये झाले आहे. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत काही अंतरावर असलेले कोनगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथे मिळालेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

खंडणीचा फोन
हॉटेलमालक प्रकाश शेट्टी यांना खंडणीचा फोन आल्याचे त्यांनी या वेळी पोलिसांना सांगितले. वरवर हा हल्ला खंडणीचा दिसत असला तरी काही वर्षांपासून शहराजवळच्या व महामार्गावरील हॉटेल व लॉजिंग व्यवसायात गँगस्टर यांची भागीदारी आहे.

Web Title: Fateful firing in Bhiwandi hotel; Suspected suspect of being part of Suresh Pujari gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे