माहेरी गेलेल्या पत्नीनं व्हिडीओ कॉलवर मुलीचा चेहरा दाखवला नाही; पित्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 01:26 PM2022-03-20T13:26:16+5:302022-03-20T13:26:34+5:30

वाद घालून पत्नी घरी आली नाही; मुलीचंही तोंड दाखवलं नाही; पित्यानं जीवनयात्रा संपवली

father committed suicide as he could not see his daughter in badlapur | माहेरी गेलेल्या पत्नीनं व्हिडीओ कॉलवर मुलीचा चेहरा दाखवला नाही; पित्याची आत्महत्या

माहेरी गेलेल्या पत्नीनं व्हिडीओ कॉलवर मुलीचा चेहरा दाखवला नाही; पित्याची आत्महत्या

Next

बदलापूर : माहेरी गेलेल्या पत्नीने सणाच्या दिवशीही तान्ह्या मुलीचा चेहरा व्हिडीओ कॉलवर न दाखवल्याने व्यथित होऊन एका पित्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री बदलापुरात घडली. दरम्यान, या घटनेमुळे हे कुटुंब मात्र उदध्वस्त झाले आहे.

शहरातील वडवली परिसरातील तलरेजा कॉलेजच्या बाजूला राजू जाधव हा तरुण त्याची पत्नी, दोन महिन्यांची मुलगी आणि आई-वडिलांसह वास्तव्याला होता. मात्र, पत्नीला वेगळे राहायचे असल्याने ती शंकरसोबत वादविवाद करून माहेरी निघून गेली होती. यानंतर शुक्रवारी धुळवड असल्याने पत्नी मुलीला घेऊन घरी येईल, अशी शंकरची अपेक्षा होती. पण पत्नी तर आली नाहीच, उलट तिने व्हिडीओ कॉलवर शंकरला मुलीचे तोंडही दाखवले नाही. यामुळे व्यथित होऊन शंकरने आपण आत्महत्या करत असल्याचे पत्नीला सांगितले आणि गळफास घेत आत्महत्या केली. 

पत्नीने ही बाब शेजारी राहणाऱ्यांना कळवल्यानंतर शंकरच्या घरच्यांनी बेडरूममध्ये धाव घेतली असता, शंकर मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे शंकरचे कुटुंब उदध्वस्त झाले.

Web Title: father committed suicide as he could not see his daughter in badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.