अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:20 PM2021-02-11T16:20:07+5:302021-02-11T21:34:44+5:30
स्वत:च्याच पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया मुंब्रा येथील ४४ वर्षीय नराधम पित्याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: स्वत:च्याच पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया मुंब्रा येथील ४४ वर्षीय नराधम पित्याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाच्या शिक्षेचाही आदेश देण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी हा तक्र ारदार पत्नी आणि पिडित पाच वर्षीय मुलीसह मुंब्य्राजवळील कौसा भागात वास्तव्याला होता. २१ मे २०१८ रोजी आरोपीने पत्नी झोपी गेली असताना, मुलीवर पहाटेच्या सुमारास अत्याचार केला. हा प्रकार तक्र ारदार पत्नीने पाहिल्यानंतर याबाबत आरोपीला तिने वारंवार विचारणा केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच घडलेला प्रकार पीडित मुलीच्या मामाला सांगितला. त्यानुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिसांनी आरोपीला २४ मे २०१८ रोजी अटक केली. तपास पूर्ण झाल्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. प्रकार विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश शिरभाते यांच्यासमोर आला. त्यावेळी सरकारी वकील संजय मोरे यांनी आठ साक्षीदारांची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल असे सबळ पुरावे सादर केले. हे सर्व पुरावे ग्राह्य मानून नराधम पित्यास न्यायालयाने दोषी ठरविले. याच खटल्याची सुनावणी १० फेब्रुवारी रोजी झाली. त्याला पोस्को कायद्यान्वये पाच वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रु पये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विद्या लांडे आणि महिला पोलीस नाईक एस. व्ही. देसाई यांनी या प्रकरणाचा यशस्वी तपास केला.