पितृपक्षाचा फटका :फुले झाली कवडीमोल, भाव घसरल्याने फुले कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 04:02 AM2018-10-01T04:02:59+5:302018-10-01T04:03:28+5:30

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुलबाजार भरतो. कल्याण परिसराला सिन्नर, जुन्नर, नाशिक, आळेफाटा, अहमदनगर या भागांमधून फुलांचा पुरवठा होतो.

Father's shock: Flowers have disappeared, flowers fall in the trash due to price drop | पितृपक्षाचा फटका :फुले झाली कवडीमोल, भाव घसरल्याने फुले कचऱ्यात

पितृपक्षाचा फटका :फुले झाली कवडीमोल, भाव घसरल्याने फुले कचऱ्यात

Next

कल्याण : सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाचा मोठा फटका फुलउत्पादक शेतकºयांना सोसावा लागत आहे. फुलांची आवक दहापटीने वाढली असून त्या तुलनेत मागणी घटल्याने फुलउत्पादक मेटाकुटीस आले आहेत. एरव्ही, ३० ते ४० रुपये किलोप्रमाणे विकल्या जाणाऱ्या झेंडूचे भाव अवघ्या पाचसहा रुपयांवर घसरल्याने हतबल झालेल्या शेतकºयांना दररोज फुलांचे ढीगच्या ढीग अक्षरश: कचºयात टाकून द्यावे लागत आहेत.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुलबाजार भरतो. कल्याण परिसराला सिन्नर, जुन्नर, नाशिक, आळेफाटा, अहमदनगर या भागांमधून फुलांचा पुरवठा होतो. दररोज साधारणत: ५० प्रकारची फुले या बाजारात विक्रीसाठी आणली जातात. बंगळुरू, गुजरातमधूनही येथील बाजारात फुले विक्रीसाठी येतात. महत्त्वाचे म्हणजे, ठाणे व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची निर्यात होत असते. शहापूर, भिवंडी, कल्याण, मुरबाड व उल्हासनगर या पाच तालुक्यांमधील हजारो किरकोळ फुलविक्रेत्यांचा व्यवसाय या बाजारावरच अवलंबून आहे.
यंदा वरुणराजाने शेतकºयांवर कृपादृष्टी दाखवली. पाऊस चांगला झाल्याने फुलांचे उत्पादन वाढले; परंतु पितृपक्ष सुरू असल्याने ग्राहकांकडून फुलखरेदी कमी होत आहे. फुलांची मागणी कमी झाल्याने ती खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही खराब होत असलेली फुले कचºयामध्ये फेकली जात आहेत. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळीसह लग्नसराईच्या काळात फुलांना मागणी असते; परंतु सध्या आवक वाढली आणि मागणी घटल्याने शेतकºयांवर विदारक परिस्थिती ओढवली असल्याचे कल्याण कृषी समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी सांगितले.

आवक दहापट
सध्या दररोज तीन ते चार टन फुले येतायत. गणपतीला झेंडूचा भाव ३० ते ४० रुपये प्रतिकिलो होता. आता मागणी घटल्याने माल उरतो. उरलेली फुले खराब होत असल्याने ती फेकली असावी, असे बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी सांगितले. फुलांची आवक दहापटीने वाढली आहे. परंतु, भाव पाच ते सहा रुपये प्रतीकिलोपर्यंत घसरल्याची माहिती फळे-फुले-फेरीवाला कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत माळी यांनी लोकमतला दिली.

Web Title: Father's shock: Flowers have disappeared, flowers fall in the trash due to price drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे