फटाकेविक्रेत्यांना परवानगीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:32 PM2018-10-30T23:32:26+5:302018-10-30T23:32:44+5:30
दीवाळी तोंडावर आली तरी कल्याण डोंबिवली महापालिकेने फटाके विक्रीसाठी विक्रेत्यांना अद्याप परवानगीच दिलेली नाही.
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : दीवाळी तोंडावर आली तरी कल्याण डोंबिवली महापालिकेने फटाके विक्रीसाठी विक्रेत्यांना अद्याप परवानगीच दिलेली नाही. ऐनवेळी परवानगी मिळाल्यास व्यवसाय करायचा तरी कसा, असा प्रश्न फटाके विक्रेत्यांकडून उपस्थित होत आहे.
फटाके विक्रेते धनंजय चाळके यांनी सांगितले की, फटाके विक्रीची परवानगी तीन ते चार महिने आधी द्यावी अशी फटाके विक्रेत्यांची मागणी असते. मात्र नेहमीच परवानगी ऐनवेळी दिली जाते. त्यामुळे विक्रेते संभ्रमात असतात. यावेळीही दिवाळीत तशीच परिस्थिती आहे. काही विक्रेते घरातील दागिने गहाण ठेवून दीड ते दोन लाख रुपयांचा माल विक्रीसाठी घेतात. काही जणांनी माल अगोदरच विकत घेतला आहे. त्याना विक्रीसाठी अद्याप परवानगीच देण्यात आलेली नाही. त्यामुळे खरेदी केलेल्या मालाचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. महापालिका मुख्य बाजारपेठेतील जागा विक्रेत्यांना देत नाही. शहराबाहेर जागा दिल्याने त्याठिकाणी वीज, पाण्याची सुविधा विक्रेत्यांनाच करावी लागते. पोलिस व अग्निशमन दलाच्या परवानगीसाठी जास्त त्रास होत नाही. मात्र महापालिकेकडून अडवणूक केली जाते. नियमानुसार परवानगी मागणाऱ्यांना नाहक त्रास दिला जातो. गाळा घेऊन व्यवसाय करण्यात आणि मैदानात व्यवसाय करण्यात बराच फरक आहे. याचा प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.
फटाके विक्रेते अशोक हनकारे यांनी सांगितले की, परवानगी मिळाली नाही तर स्टॉल्स न लावण्याचा पवित्रा काही विक्रेत्यांनी घेतला आहे. स्टेशनजवळ असलेल्या मैदानात जागा दिली जात नाही. पश्चिमेतील भागशाळा मैदान हे स्टेशनपासून जरा जवळ असले तरी क्रीडासंकुल स्टेशनपासून लांब आहे. तेथे ग्राहक येतीलच असे नाही. अनेकदा स्टॉल्स लावून व्यवसाय होईलच याची हमी नसते. कोर्टाकडून बंदी नसताना महापालिकेकडून अडवणुकीचे धोरण राबविले जात आहे. पूर्वेतील नेहरु मैदान, स. वा. जोशी शाळेचे प्रांगण विक्रेत्यांना दिले पाहिजे. ही जागा स्टेशनपासून जवळ आहे. डोंबिवलीत ५० स्टॉल्स लावले जातात. दिवाळीत फटाक्यांच्या बाजारपेठेला तसाच कमी प्रतिसाद आहे. दिवाळीत अनेक लोक सुट्टी म्हणून पर्यटनासाठी पळतात. त्यामुळे गेल्या वर्षांपासून फटाक्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.
परवानगी सरसकट नाकारली नाही
डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात ३५ दुकानदारांना फटाके विक्रीची परवानगी दिली असल्याची माहिती पालिका अधिकाºयांनी दिली. तेथील उपलब्ध जागा लक्षात घेता आणखी दुकानदारांना परवानगी देणे शक्य नाही. काही दुकानदार राहिले असतील, तर त्यांना कुठे समावून घ्यायचे, याचा विचार सुरु आहे.
पोलिस, अग्नीशमन दल यांच्या निकषांच्या आधारे फटाके विक्रेत्यांना परवानगी दिली जाते. या निकषांची पूर्तता करणाºयांना नक्कीच परवानगी दिली जाणार आहे. जागा किती उपलब्ध आहे याचाही विचार केला जातो. काहींची परवानगी राहिली असल्यास सर्वांनाच सरसकट नाकारली असे
होत नाही.