उल्हासनगरातील दुकानावर एफडीएची कारवाई; ३५ हजारांपेक्षा जास्तचे फरसाण जप्त

By सदानंद नाईक | Published: September 4, 2023 04:29 PM2023-09-04T16:29:30+5:302023-09-04T16:30:26+5:30

उल्हासनगरात फरसाण, मिठाई बनविण्याचे मोठे दुकाने असून येथील मिठाई व फरसाणला इतर ठिकाणी मोठी मागणी आहे.

fda action on shop in ulhasnagar farsan of more than 35 thousand seized | उल्हासनगरातील दुकानावर एफडीएची कारवाई; ३५ हजारांपेक्षा जास्तचे फरसाण जप्त

उल्हासनगरातील दुकानावर एफडीएची कारवाई; ३५ हजारांपेक्षा जास्तचे फरसाण जप्त

googlenewsNext

सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-१ परिसरातील जे के फरसाण दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करून ३५ हजारा पेक्षा जास्त किमतीचे फरसाण ताब्यात घेतले. तर काहीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती विभागाचे निरीक्षक व्ही एच चव्हाण यांनी दिली आहे.

उल्हासनगरात फरसाण, मिठाई बनविण्याचे मोठे दुकाने असून येथील मिठाई व फरसाणला इतर ठिकाणी मोठी मागणी आहे. कॅम्प नं-१ येथील जे के फरसाण दुकानात अनियमितता असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. पथकाचे नितीक्षक व्ही एच चव्हाण यांनी दुकानावर धाड टाकून संशयित वाटणारे फरसाण ताब्यात घेतले. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवार कारवाई करीत काही फरसाण खेळून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविली. जो पर्यंत फरसाण नमुना तपासणीचा अहवाल येत नाही. तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याचें आदेश दिल्याची माहिती निरीक्षक चव्हाण यांनी दिली आहे. 

जे के फरसाण दुकांदाराने फरसाण उत्पादना साठी परवानगी न घेणे, फरसाण बनविण्यासाठी वापरण्यात येत असलेले पाणी, दुकानातील कामगारांचे वैधकीय प्रमाणपत्र, बनविलेल्या पदार्थावर लाइसेंस नंबराचा उल्लेख नसणे, आदी लहान सहान चुका उघड झाल्या आहेत. शहरातील दुकानात फरसाण प्रमाणे मिठाई, मोदक, खव्वा मोठ्या प्रमाणात बनवितात. याकडेही सणासुदीच्या दिवसात एफडीए विभागाचे लक्ष असल्याचे विभागाचे निरीक्षक व्ही एम यांनी दिली आहे.

 

Web Title: fda action on shop in ulhasnagar farsan of more than 35 thousand seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :FDAएफडीए