ठाण्यातील बिकानेर स्वीट्सला एफडीएचा दणका: व्यवसाय बंद करण्याचे आदेश

By जितेंद्र कालेकर | Published: August 9, 2023 08:32 PM2023-08-09T20:32:40+5:302023-08-09T20:32:50+5:30

ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई : मुदतीचा उल्लेख नसण्यासह अनेक त्रुटी

FDA slaps Bikaner Sweets in Thane: orders to shut down business | ठाण्यातील बिकानेर स्वीट्सला एफडीएचा दणका: व्यवसाय बंद करण्याचे आदेश

ठाण्यातील बिकानेर स्वीट्सला एफडीएचा दणका: व्यवसाय बंद करण्याचे आदेश

googlenewsNext

ठाणे: जनहित व जनआरोग्याचे सर्वच नियमावली पायदळी तुडविल्याचा ठपका ठेवत तसेच सुटया िमठाईवर मुदतीचा उल्लेख नसण्यासह अनेक त्रुटी आढळल्यामुळे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील बिकानेर स्वीट्स या मिठाई विक्रेत्यास व्यवसाय बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने काढले आहेत. अशाप्रकारे नामांकित स्वीट्स दुकानांमध्ये व्यवसाय बंद करण्याची ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी दिली. याप्रकरणी गुन्हाही दाखल होऊ शकतो, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

नुकतेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीकोनातून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरची पहिलीच कारवाई आहे. अन्न व अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे, ठाण्याचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवलीतील बीकानेर स्वीट्स मिठाई शॉपची अन्न व औषध प्रशासन विभागाने अचानक तपासणी केली. या तपासणीत विनापरवाना विविध प्रकारच्या मिठाई व फरसाण आदी अन्न पदार्थाचे उत्पादन करीत असल्याचे आढळले.

तसेच अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरलेले पाणीही पिण्यायोग्य असल्याचा अहवालही नव्हता. अन्न पदार्थ हाताळणारे कामगार संसर्गजन्य त्वचारोग आणि तशाच आजारापासून मुक्त आहेत किंवा नाही, याचीही खातरजमा होण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकाकडून तपासणी केलेली नव्हती. उत्पादन प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी आवश्यक शैक्षिणक पात्रतेच्या व्यक्तीती पर्यवेक्षक" म्हणून नेमणूक नव्हती. अन्नपदार्थाच्या खरेदीची बिले नव्हती. मिठाई विक्री करताना ट्रे वर अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणानुसार खुल्या स्वरुपात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या कंटेनरवर अन्नपदार्थाच्या मुदतीची तारखेचा तपशीलाचा उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळेच सहायक आयुक्त (अन्न) व्यं. व. वेदपाठक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अन्नपदार्थाचे विक्रीसाठी उत्पादन करताना कोणतीही व खबरदारी घेतलेली नसल्याचे िबकानेर या दुकानात आढळले. त्यामुळेच त्रुटीची पूर्तता करेपर्यत बिकानेर स्वीट्स विक्रेत्याला व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.नियमांचे उल्लंघन केल्यास दाेन लाखांच्या दंडाची कारवाई हाेउ शकते.
सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), काेकण विभाग, अन्न व औषध प्रशासन, ठाणे

Web Title: FDA slaps Bikaner Sweets in Thane: orders to shut down business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे