सणासुदीच्या काळात चेन स्नॅचिंगची भीती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:46 AM2021-09-14T04:46:35+5:302021-09-14T04:46:35+5:30

मीरा रोड : सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, महिलांनी काळजी घेतली नाही तर चोरट्यांसाठी हा सण सुगीचा काळ ठरणार ...

Fear of chain snatching increased during the festive season | सणासुदीच्या काळात चेन स्नॅचिंगची भीती वाढली

सणासुदीच्या काळात चेन स्नॅचिंगची भीती वाढली

Next

मीरा रोड : सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, महिलांनी काळजी घेतली नाही तर चोरट्यांसाठी हा सण सुगीचा काळ ठरणार आहे. मीरा भाईंदरमध्ये चेन स्नॅचर सक्रिय असून, दोन घटनांमध्ये दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून चोरट्यांनी पळ काढला आहे.

मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शीतलनगर, एमटीएनल मार्गावरील डीसीबी बँकेजवळ बेबीकुमारी पाटकर (४२) यांच्या गळ्यातील ४४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. त्याआधी काशिमीरा येथील संत एन्स रुग्णालयासमोर बसस्थानक येथे आशादेवी कुंभार यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची सोनसाखळी तोडून दुचाकीस्वाराने पोबारा केला. आशादेवी पतीसह ठाण्याला जाण्यासाठी सकाळी थांबल्या असता दुचाकी बिघडल्याचे कारण सांगून चोरट्याने डाव साधला. याआधी नवघर पोलीस ठाण्यातसुद्धा चेन स्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या आहेत.

Web Title: Fear of chain snatching increased during the festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.