...भय इथले संपत नाही!, कल्याणमधील स्कायवॉकची दुर्दशा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 05:29 AM2018-12-21T05:29:51+5:302018-12-21T05:30:33+5:30

कल्याणमधील स्कायवॉकची दुर्दशा : अडथळे पार करताना जीव टांगणीला

... fear does not end here !, Skywalk plight in Kalyan | ...भय इथले संपत नाही!, कल्याणमधील स्कायवॉकची दुर्दशा

...भय इथले संपत नाही!, कल्याणमधील स्कायवॉकची दुर्दशा

Next

कल्याण : रेलिंग तुटलेल्या कल्याणच्या स्कायवॉकवरून पडून बबलू तलर हा दृष्टिहीन पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना मे महिन्यात घडली होती. मात्र, त्यानंतरही तुटलेले रेलिंग, गायब झालेले संरक्षक बार आणि तुटलेल्या लाद्या बसवण्यासाठी केडीएमसीला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे स्कायवॉकवर अपघाताचा धोका कायम आहे.

रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यातून सुटका करण्यासाठी २०१०-११ मध्ये पश्चिमेत स्कायवॉक उभारण्यात आला. एमएमआरडीएने बांधलेल्या स्कायवॉकची जबाबदारी सध्या केडीएमसीवर आहे. स्कायवॉक रेल्वेच्या पुलाला जोडून असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी त्याचा वापर करतात. या स्कायवॉकमुळे फेरीवाल्यांचा त्रास वाचेल, तसेच कोंडीतून मुक्तता होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, फेरीवाल्यांनीच स्कायवॉकवर ठाण मांडल्याने पादचाऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. याला सर्वस्वी केडीएमसी कारणीभूत असली तरी काहीअंशी फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करणारे नागरिकही या परिस्थितीला जबाबदार आहेत. फेरीवाल्यांच्या कचºयामुळे याठिकाणी आगीच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत.
फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबरोबरच भिकारी, गर्दुल्ल्यांच्या उपद्रवामुळे प्रवाशांना रात्री उशिरा जीव मुठीत धरून येजा करावी लागते. फेरीवाले, भिकारी आणि गर्दुल्ले यांच्यामुळे स्कायवॉकला बकाल स्वरूप आले आहे. केडीएमसीकडून स्वच्छतेचे धडे दिले जातात. मात्र, स्वत:च्या स्कायवॉकवर जमा होणाºया कचºयाची कधी गंभीर दखल घेणार, असा सवालही नागरिक करत आहेत. स्कायवॉक परिसरात वारांगनांचाही वावर असतो. मात्र, स्थानिक महात्मा फुले चौक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
स्कायवॉकवरील संरक्षक बार व रेलिंग तुटलेल्या अवस्थेत आहेत. मे महिन्यात अपघात घडूनही केडीएमसीला घटनेचे गांभीर्य नसल्याचे सद्य:स्थिती पाहता स्पष्ट होते. स्कायवॉकच्या जिन्याचा भाग ओबडधोबड झाल्याने पाय घसरून अथवा तोल जाऊन गंभीर दुखापत होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. येथील तुटलेल्या लाद्यांमुळेही काही पादचारी जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे ‘स्कायवॉकवरून चालताय, पण जीव सांभाळून’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

निविदेचे काय झाले?
च्मे महिन्यातील घटनेनंतर स्कायवॉकच्या दुरुस्तीचे काम केले जाणार होते. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त गोविंद बोडके यांनी मान्यता दिल्याची तसेच दुरुस्ती कामाची निविदा काढल्याची माहिती तत्कालीन शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दिली होती.

च्परंतु, अजूनही या कामाला मुहूर्त मिळाला नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. यासंदर्भात बोडके यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Web Title: ... fear does not end here !, Skywalk plight in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.