ठाण्यातील २६ ठिकाणी भूस्खलन होण्याची भीती
By admin | Published: June 1, 2017 05:02 AM2017-06-01T05:02:05+5:302017-06-01T05:02:05+5:30
ठाणे महापालिकेने डोंगराळ भागात राहणाऱ्या परिसरांचे सर्वेक्षण केले असून १४ ठिकाणांची यादी तयार केली आहे. यात २६ जागांमध्ये
ठाणे : ठाणे महापालिकेने डोंगराळ भागात राहणाऱ्या परिसरांचे सर्वेक्षण केले असून १४ ठिकाणांची यादी तयार केली आहे. यात २६ जागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यास भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी येथील रहिवाशांना पालिकेने नोटिसा बजावल्या असून घरे खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
पावसाळ्यात भूस्खलनाच्या घटना होऊ नये, म्हणून सतर्कता दाखवून पालिका हद्दीतील भूस्खलन भागांतील रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, त्यानंतरही हे रहिवासी जीव धोक्यात घालून नाइलाजास्तव राहत आहेत. ठाण्याच्या मुंब्रा, लोकमान्यनगर, इंदिरानगर, सारखे परिसर संवेदनशील आहेत.
भूस्खलन होण्याची ठिकाणे :
संतोषनगर, पाटीलनगर, डक्टलाइन, रेल्वे कॉलनी, सेंट उलाई स्कूल, हनुमाननगर, शंकर मंदिर, इंदिरानगर टेकडी, रूपादेवी, भास्करनगर, पौंडपाडा, शिवशक्ती नगर, घोलाईनगर, वाघोबानगर, गावदेवी मंदिर (मुंब्रा), केणीनगर, कैलासनगर, पातलीपाडा, सैनिकनगर, डोंगरीपाडा, कशेळीपाडा, गुरुदेव आश्रम आणि उपवन.
१४ ठिकाणी पाणी साचणार
उंचसखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. यात देवनायर सोसायटी, वंदना सिनेमा, गजानन चौक, गडकरी चौक, देवधर अस्पताल, जिजामाता मार्केट, पम्पिंग स्टेशन, चव्हाण चाळ, वृंदावन, श्रीरंग सोसायटी, पंचामृत, आयसीआयसीआय बँक, घोडबंदर रोड, विटावा सब वे आणि दिवागाव.