पाण्यासाठी विहिरीवर होणाऱ्या गर्दीतून कोरोना पसरण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:37+5:302021-05-07T04:42:37+5:30
मुंब्रा : दिव्यातील साबे गावातील विहिरीवर पाण्यासाठी होत असलेल्या गर्दीतून कोरोना पसरण्याची भीती भाजपच्या दिवा मंडळच्या महिला अध्यक्षा अर्चना ...
मुंब्रा : दिव्यातील साबे गावातील विहिरीवर पाण्यासाठी होत असलेल्या गर्दीतून कोरोना पसरण्याची भीती भाजपच्या दिवा मंडळच्या महिला अध्यक्षा अर्चना पाटील यांनी व्यक्त केली आहे. येथील डीजे कॉम्प्लेक्स परिसरात मागील काही वर्षांपासून पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य जाणवत आहे. दैनंदिन वापरासाठी पाणी विकत घेण्यासाठी येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करावे लागत आहेत. पैसे देऊनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्यामुळे परिसरात असलेल्या विहिरीवर पाण्यासाठी स्थानिक महिलांची नेहमी झुंबड उडालेली असते. या गर्दीमधून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे होऊ नये यासाठी येथील ज्या भागांमध्ये जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत, त्या ठिकाणी जलवाहिन्या टाकून, स्थानिकांना घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवण्याची व्यवस्था आठ दिवसांमध्ये करण्यात यावी. अन्यथा दिवा प्रभाग समिती कार्यालयावर हंडा- कळशी मोर्चा काढण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.