काय कुणाची भीती? न्यायालयाचा डोंबिवलीत अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 02:25 AM2017-12-23T02:25:55+5:302017-12-23T02:26:18+5:30

केडीएमसीने उशिरा का होईना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक परिसरात पट्टे मारून फेरीवाल्यांना १५० मीटरच्या परिसरात व्यवसाय करण्यास निर्बंध घातले. परंतु, या परिसरातही फेरीवाले बिनदिक्कतपणे व्यवसाय करत आहेत. त्यावरून ‘आम्हास काय कोणाची भीती’ अशा आविर्भावात ते वावरत आहेत, असे काहीसे चित्र डोंबिवलीत पाहावयास मिळत आहे.

 Fear of what? Dobbliate contempt of court | काय कुणाची भीती? न्यायालयाचा डोंबिवलीत अवमान

काय कुणाची भीती? न्यायालयाचा डोंबिवलीत अवमान

googlenewsNext

डोंबिवली : केडीएमसीने उशिरा का होईना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक परिसरात पट्टे मारून फेरीवाल्यांना १५० मीटरच्या परिसरात व्यवसाय करण्यास निर्बंध घातले. परंतु, या परिसरातही फेरीवाले बिनदिक्कतपणे व्यवसाय करत आहेत. त्यावरून ‘आम्हास काय कोणाची भीती’ अशा आविर्भावात ते वावरत आहेत, असे काहीसे चित्र डोंबिवलीत पाहावयास मिळत आहे.
रेल्वेस्थानक परिसरात व्यवसाय करण्यास मज्जाव केल्याने रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झाल्याकडे लक्ष वेधत फेरीवाल्यांनी गुरुवारी केडीएमसीवर मोर्चा काढला. या वेळी झालेल्या सभेत महापालिकेने हॉकर्स झोनमध्ये आम्हाला व्यवसाय करण्यास मुभा द्यावी, त्यासाठी हे झोन अतिक्रमणातून मोकळे करून द्यावेत, अशी मागणी फेरीवाला संघटनांच्या नेत्यांनी केली. दुसरीकडे मोर्चाला परवानगी नसल्याने आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका अधिकाºयांबरोबर केलेली चर्चाही निष्फळ ठरली.
दरम्यान, कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवण्यात हयगय करणाºया नऊ कर्मचाºयांना आयुक्त पी. वेलरासू यांनी निलंबित केले होते. ‘फेरीवाला हटाव’ मुळे डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर मोकळा झाला होता. परंतु, पुन्हा अतिक्रमण वाढू लागल्याने वेलरासू यांनी डोंबिवलीतही फेरफटका मारून वास्तव पाहावे, अशी मागणी होत आहे.
कारवाई पथकाचाच आशीर्वाद?
रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटरवर मारलेल्या पट्ट्याच्या आत परिसरात व्यवसाय करण्यास मज्जाव केला असतानाही फेरीवाल्यांनी आपले ठेले मांडल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. फेरीवालाविरोधी पथकाचे वाहन, पोलीस आणि पालिका कर्मचारीवर्ग उपस्थित असतानाही रेल्वेस्थानक परिसरात राजरोसपणे फेरीवाल्यांचे व्यवसाय सुरू होते. त्यामुळे आयुक्त पी. वेलरासू पथकावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title:  Fear of what? Dobbliate contempt of court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.