शस्त्राचा धाक दाखवून रिक्षाप्रवाशाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:24 AM2021-03-30T04:24:14+5:302021-03-30T04:24:14+5:30

मुंब्राः रिक्षाचालकाच्या मदतीने रिक्षातील प्रवाशाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना उघडकीस आली. कल्याण येथील काटेमानवली भागातील पावशे चौकात ...

Fearing for their lives, they robbed the rickshaw puller | शस्त्राचा धाक दाखवून रिक्षाप्रवाशाला लुटले

शस्त्राचा धाक दाखवून रिक्षाप्रवाशाला लुटले

Next

मुंब्राः रिक्षाचालकाच्या मदतीने रिक्षातील प्रवाशाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना उघडकीस आली. कल्याण येथील काटेमानवली भागातील पावशे चौकात राहणारे धीरेंद्र पांडे शीळफाटा ते कल्याण डोंबिवली रोड जवळील एका हॉटेल दरम्यान रिक्षाने प्रवास करत होते. त्यावेळी रिक्षात बसलेल्या दोन सहप्रवाशांनी रिक्षाचालकाच्या मदतीने पांडे यांना पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून ५५ हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख ४८० रुपये लुटून पोबारा केला, अशी तक्रार पांडे यांनी शनिवारी दाखल केली. या तक्रारीवरून रिक्षाचालकासह तिघांवर शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Fearing for their lives, they robbed the rickshaw puller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.