प्रेमात अपयश आल्याने महिला हवालदाराच्या मुलाची आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Published: February 28, 2024 10:17 PM2024-02-28T22:17:05+5:302024-02-28T22:17:13+5:30

चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा, कोणीही जबाबदार नसल्याची चिठ्ठी

Female constable's son commits suicide due to failure in love | प्रेमात अपयश आल्याने महिला हवालदाराच्या मुलाची आत्महत्या

प्रेमात अपयश आल्याने महिला हवालदाराच्या मुलाची आत्महत्या

ठाणे: वसंत विहार येथील रहिवासी मोहित खापरे (२४) याने आपल्या राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसून प्रेमप्रकरणातील अपयशाने आपण हा निर्णय घेतल्याची चिठ्ठी त्याने लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोहित हा गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त होता. त्याने २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घरातील पंख्याला ओढणीच्या सहायाने आत्महत्या केली. मोहितची आई कापूरबावडी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहे. आई ड्युटीवर तर वडीलही बाहेर गेले होते. त्याची चुलत बहीण जागृती पाटील ही त्यांच्याकडे काही कामानिमित्त आली. त्यावेळी मोहितने गळफास घेतल्याचे समोर झाले. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले. दरम्यान, प्रेमप्रकरणातील अपयशाने आपण हा निर्णय घेतला असल्याची चिठ्ठी त्याने लिहून ठेवल्याचे चितळसर पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये आढळले. सहायक पोलिस निरीक्षक मुक्ता फडतरे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Female constable's son commits suicide due to failure in love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.