महिला आरोग्य निरीक्षक उतरली मॅनहोलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:00+5:302021-06-09T04:50:00+5:30
भिवंडी : प्रभाग समिती क्रमांक दोनअंतर्गत शांतिनगर, आझादनगर ,चाविंद्रा, अवचितपाडा, खंडूपाडा या भागातील पाणी वाहून नेण्यासाठी भलामोठा नाला आरिफ ...
भिवंडी : प्रभाग समिती क्रमांक दोनअंतर्गत शांतिनगर, आझादनगर ,चाविंद्रा, अवचितपाडा, खंडूपाडा या भागातील पाणी वाहून नेण्यासाठी भलामोठा नाला आरिफ गार्डन येथून पुढे जातो. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षक सुविधा चव्हाण यांच्यावर आहे. त्या नाल्याच्या सफाई कामावर हजर राहून देखरेख करीत असताना नक्की काम किती झाले हे पाहण्यासाठी त्या थेट मॅनहोलमध्येच उतरल्या होत्या. याची सर्वत्र चर्चा सुरू झाली असून बऱ्याच वेळा अधिकारी, लोकप्रतिनिधी नाल्याच्या कडेला उभे राहून नालेसफाईच्या कामाची पाहणी करताना पाहतो. तेथे फोटो सेशनही होते. परंतु नक्की काय काम झाले. हे पाहण्यासाठी एक महिला आपला पदर कंबरेला खोचून नाल्यात उतरली याचे सर्वांकडून कौतुक केले जात असून, सोशल मीडियावरही त्यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.