महिला प्रभाग अधिकारी अटकेत
By admin | Published: July 2, 2017 06:00 AM2017-07-02T06:00:08+5:302017-07-02T06:00:08+5:30
घरदुरुस्तीची परवानगी देण्याच्या बदल्यात २५ हजार रुपयांची लाच घेताना केडीएमसीच्या ‘जे’ प्रभाग क्षेत्राच्या अधिकारी स्वाती गरूड
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : घरदुरुस्तीची परवानगी देण्याच्या बदल्यात २५ हजार रुपयांची लाच घेताना केडीएमसीच्या ‘जे’ प्रभाग क्षेत्राच्या अधिकारी स्वाती गरूड यांना ठाणे लाचलुचपतविरोधी पथकाने शनिवारी रंगेहाथ अटक केली. महापालिकेच्या इतिहासात लाच घेणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
तक्र ारदाराने घराच्या दुरु स्तीच्या परवानगीसाठी महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील ‘जे’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, प्रभाग अधिकारी गरूड यांनी ही दुरु स्ती बेकायदा ठरवली. तसेच कारवाई करण्याची धमकी तक्रारदाराला दिली. मात्र, कारवाई टाळण्यासाठी ३० हजार रु पयांची मागणी केली. त्याविरोधात तक्र ारदाराने ठाणे लाचलुचपतविरोधी पथकाकडे तक्र ार नोंदवली होती. त्यानुसार, शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास ठाणे लाचलुचपतविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून गरूड यांना २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
भ्रष्टाचाराने बरबटलेली महापालिका
केडीएमसीकडे भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बरबटलेली महापालिका म्हणून पाहिले जाते. आतापर्यंत उपायुक्त सु. रा. पवार, कार्यकारी अभियंता सुनील जोशी, प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे, सुहास गुप्ते यांच्यासह सुमारे १५ ते १६ कर्मचाऱ्यांना लाचखोरीप्रकरणी अटक झाली आहे. त्यात आता गरूड यांची भर पडली आहे.