पाचव्या माय ठाणे शॅार्ट फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन अॅड.निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 04:56 PM2019-12-14T16:56:36+5:302019-12-14T17:04:22+5:30
पाचव्या माय ठाणे शॅार्ट फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन पार पडले.
ठाणे : ब्ल्यू एंटरटेनमेंट व सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज ठाणे यांची प्रस्तुती असलेल्या पाचव्या माय ठाणे शॉर्ट फिल्म फेस्टिवल डिसेंबर 2019 या दोन दिवसीय फेस्टिव्हलचे उद्घाटन अॅड. निरंजन डावखरे आमदार कोकण पदवीधर मतदारसंघ यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
देशभरातून दीडशेहून अधिक शॉर्टफिल्मने या महोत्सवात सहभाग घेतला आहे उद्घाटनाच्या प्रसंगी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान खजिनदार सतीश शेठ तसेच आदर्श विकास मंडळचे अध्यक्ष सचिन मोरे उपस्थित होते. शॉर्ट फिल्म हे कमी वेळात सामाजिक समस्यांबाबत खूप प्रभावी भाष्य करणारे माध्यम आहे असे प्रतिपादन अॅड. निरंजन डावखरे यांनी केले तर सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान यांनी शॉर्टफिल्म ही चळवळ ठाण्यातील शाळा-कॉलेजमध्ये राबवली गेली पाहिजे व त्यादृष्टीने आयोजन कसे करावे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तरुण कॉलेज वर्गाने उस्फूर्त प्रतिसाद दिला. सदर फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता चित्रकला स्पर्धेचे हि आयोजन करण्यात आलेले असून विविध शालेय विद्यार्ध्यांना ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. या स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन व विजेत्यांना जगदीश थोरात, माजी वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य, ठा. म. पा. यांच्या हस्ते एकूण २५ बक्षीसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता, प्रमुख पाहुणे म्हणून पल्लवी प. कदम, उप महापौर, ठा.म.पा व नम्रता संभेराव, फिल्म अभिनेत्री व इतर मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार आहे. देशभरातून आलेल्या एकूण लघुचित्रपटांपैकी निवडक ६० लघुपटाचे स्क्रिनिंग यावेळी होणार आहे. या लघुचित्रपटामध्ये एकापेक्षा एक प्रतिभासंपन्न कलाकाराच्या अभिनयाने नटलेल्या लघुचित्रपटाच्या मेजवानीचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना यावेळी अनुभवता येणार आहे. या महोत्सवावेळी लघुचित्रपटासाठी (शॉर्ट फिल्म) फिल्ममेकर्सना विविध विभागवार ३४ बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. तसेच, या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना चित्ररत्न हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ५ वा माय ठाणे शॉर्ट फिल्म फेस्टिवल डिसेंबर २०१९, नक्कीच रंगतदार व प्रेक्षणीय होणार यात काही शंकाच नाही तरीही जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी सदर शॉर्ट फिल्म फेस्टिवलचा आस्वाद घेण्यासाठी यावे व www.blueentertainment.in या संकेत स्थळावर संपर्क साधावा असे आवाहन ब्लू एंटरटेनमेंटचे, पार्टनर्स तर्फे एकनाथ पवळे यांनी केले.