मध्य रेल्वेची पाचवी-सहावी मार्गिका मार्च २०२२ अखेर मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:45 AM2021-09-05T04:45:39+5:302021-09-05T04:45:39+5:30

कल्याण : मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात असून, ते मार्च २०२२ अखेर पूर्ण होणार ...

The fifth-sixth line of Central Railway will be completed by the end of March 2022 | मध्य रेल्वेची पाचवी-सहावी मार्गिका मार्च २०२२ अखेर मार्गी

मध्य रेल्वेची पाचवी-सहावी मार्गिका मार्च २०२२ अखेर मार्गी

Next

कल्याण : मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात असून, ते मार्च २०२२ अखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे उपनगरी रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढतील, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

शिंदे यांनी कळवा-खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर मुंब्रा ते कोपर स्थानकादरम्यान रेल्वे गाडीच्या गार्डच्या केबीनमध्ये बसून पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी रमेश म्हात्रे, सदानंद थरवळ, राजेश कदम, आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, पाचव्या व सहाव्या मार्गिकांचे काम मार्गी लागल्यावर २५ ते ३० गाड्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत. या मार्गिकांअभावी यापूर्वी एका एक्स्प्रेसच्या मागे तीन लोकलचा खोळंबा होत होता. मार्गिकांचा विस्तार झाल्याने जलद गाड्यांसाठी दोन, धीमी गाड्यांसाठी दोन आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी दोन-दोन मार्गिका उपलब्ध होतील. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा खोळंबा होणार नाही. त्याचा मोठा फायदा प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीसाठी होणार आहे. रेल्वे मार्गावर यापूर्वी ठाकुर्ली, आंबिवली, दिवा आणि कळवा-खारेगाव येथे रेल्वे फाटक होते. ठाकुर्ली आणि आंबिवली येथील फाटक बंद करून तेथे पूल उभारण्यात आले आहेत. खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचे कामही दोन महिन्यांत पूर्ण झाल्यावर खारेगावचे फाटक बंद होईल. दिव्याचेही फाटक बंद केले जाणार आहे.

‘कोपर स्थानक ते रिंग रोडला जोडणारा रस्ता तयार करा’

- कोपर स्थानकातील होम प्लॅटफॉर्मची पाहणीही शिंदे यांनी यावेळी केली. तेथील होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असून, त्याचा वापरही सुरू झाला आहे. विजेचे दिवे बसविणे, तसेच काही छोटी कामे सुरू आहेत. अप्पर कोपरचा पूल अरुंद असून, तो दुप्पटीने वाढविण्याचा प्रस्ताव आहे.

- याशिवाय कोपर येथून केडीएमसीचा रिंग रोड जात आहे. कोपर स्थानक ते रिंग रोडला जोडणारा रस्ता तयार करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचाही विचार केला जाणार आहे.

- दिवा स्थानकातही होम प्लॅटफार्म करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या असून, त्यात काही तांत्रिक अडचणी असल्या तरी त्या दूर करून होम प्लॅटफार्म करण्यास रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखविली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

-------------------

Web Title: The fifth-sixth line of Central Railway will be completed by the end of March 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.